शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

राष्ट्रसंत तुकडोजी मार्केट यार्डवर सोयाबीनच्या खरेदीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:31 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मार्केट यार्डमध्ये सोयाबीन खरेदीला सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्दे२,८०१ रुपये भाव : आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मार्केट यार्डमध्ये सोयाबीन खरेदीला सुरूवात झाली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल २ हजार ८०१ रुपये भाव दिल्या जात आहे. खरेदीच्या सुभारंभ प्रसंगी आफताब खान, पप्पु गणी, पांडुरंग बाभुळकर, गणेश गुप्ता, खुशाल लोहकरे, महादेव बादले, प्रभाकर हरदास, मुकूंद सांगाणी, शंकर डहाके आदींची उपस्थिती होती. पहिल्यादिवशी सुमारे ९०० क्विंटलची आवक झाली.यार्डात प्रथम येणारे शेतकरी विनोद लिलेश्वर वांदीले यांचा अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर उमरी येथील केशव बळीराम पाखरकर व भाऊराव खेकडे यांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी आजच्या घडीत कोणताही व्यापारी धान्य किंवा कापूस घेण्याचा मनस्थितीत नाही. सुरूवात असल्याने २,८०१ भाव मिळाला. तोही हमी भावापेक्षा कमी असल्याची मला जाण आहे. शासनाने शासकीय खरेदीसाठी १८ तारखेपासून आॅनलाईन नोंदणीचे संकेत दिले आहे. आमच्या खरेदी विक्री संघाचा एक कर्मचारी याच बाजार समितीत नोंदणीसाठी बसणार आहे. ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी ७/१२, पेरापत्रक, अंदाजे उत्पन्न दाखवून नोंदणी करून घ्यावी. ज्या शेतकºयाला पैसाची गरज आहे. त्यांनी वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवून तारण योजनेचा लाभ घ्यावा. हिंगणघाट बाजार समिती दुसºया दिवशी ६५-७० टक्के रक्कम अदा करेल असे त्यांनी सांगितले. शेतकºयांनी आपला शेतमाल केवळ परवानाधारक व्यापाºयांनाच विकावे. परवाना नसणाºया खासगी व्यापाºयाला शेतमाल विकल्यास फसवणुकीची भीती असते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक वांदीले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बाजार समितीचे सचिव शंकर धोटे यांनी केले तर आभार शांतीलाल गांधी यांनी मानले. कार्यक्रमाला बाजार समितीचे उपाध्यक्ष मनिष निखाडे, महादेव बादले, महेश झोटींग, गंगाधर हिवंज, संजय तुराळे, जीवन गुरनुले, जनार्धन हुलके, गणेश वैरागडे, वसंत महाजन, भागवत गुळघाणे, खविसचे संचालक शांतीलाल गांधी, वामन डंभारे, शालिक वैद्य, केशव भोले, हरिभाऊ बोंबले, रामभाऊ चौधरी, गणेशनारायण अग्रवाल, मेघश्याम ढाकरे, दोंदळ, कमलाकर कोटमकर, अभय लोहकरे, खविसचे मोतीराम जीवतोडे, भूजंग अंड्रस्कर यांच्यासह अडते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता लक्ष्मण वांदीले, राजू काळमेघ, जनार्धन राऊत, विष्णु खुरपुडे, शंकर राऊत, राजू वागदे आदींनी सहकार्य केले.