शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

हिंगणघाट येथे ‘नो-व्हेईकल डे’ चा शुभारंभ

By admin | Updated: February 5, 2016 01:38 IST

वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याकरिता जनमानसात जागृती व्हावी म्हणून गुरुवारी सकाळी ९ वाजता गोकुलधाम मैदानावरून रॅली काढण्यात आली.

हिंगणघाट : वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याकरिता जनमानसात जागृती व्हावी म्हणून गुरुवारी सकाळी ९ वाजता गोकुलधाम मैदानावरून रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने फिरत त्याच मैदानावर विसर्जित झाली. आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा संकल्प जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याकरिता निघालेल्या या रॅलीत अनेक नागरिक स्वयंस्फूर्त सहभागी झाले. जगात सर्वत्र प्रदूषणाची समस्या उग्ररूप धारण करीत आहे. यावर पर्यावरणाचा समतोल साधण्याची गरज आहे. यातूनच त्याववर आळा घालणे शक्य असल्याची गरज व्यक्त होत आहे. ही बाब केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात कृतीत यावी व नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे म्हणून जनजागृती आवश्यक आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या डिझेल पेट्रोलवर चालणारी वाहने नागरिकांनी केवळ आवश्यक वेळीच वापरून अनावश्यक वापर टाळावा. यातून पैश्याची बचत व आरोग्याचा लाभ याची जाणीव ठेवून ‘नो व्हेईकल डे’ च्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदविला.हिंगणघाट येथे नगराध्यक्षाचा सहभागहिंगणघाट : ‘नो व्हेईकल डे’च्या उपक्रमात बाजार समिती सभापती तथा नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, न.प. मुख्याधिकारी अनिल जगताप, तहसीलदार दीपक कारंडे, नायब तहसीलदार अरविंद हिंगे, लोमा खोडे, नगरसेवक सौरभ तिमांडे, प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष सुनील पिंपळकर, जिल्हा अध्यक्ष गणेश मुंगले, अ‍ॅड. इब्राहिम बख्श, प्रदीप नागपूरकर, सुनील डोंगरे, अन्न पुरवठा निरीक्षक गजानन टेकाडे, रूपेश लाजुरकर, तुषार हवाईकर, लता बेलेकर, किरण गहेरवार, कैलास घोडे, प्रवीण मुजबैले, पंकज भोंगाडे, राजू चौधरी, प्रभाकर मुंगले, शशिकांत डुंबरे, निलेश हाडके, चंद्रकांत ननंदकर, शेख इमाम, शुभम भजभुजे, रितेश पोकळे, कांचन ननंदकर, जगदीश वांदिले, उमेश राऊत, अनिल झाडे, हनुमान मुडे, प्रशांत भेदुरकर, स्वप्नील बाराहाते, प्रफुल्ल मेश्राम, प्रशांत इचवे, प्रवीण सातपुते, रेणुका दवंडे, कविता व्यास, शिवांजली आभाळे, अश्विनी ढेकले, सोनाली मुजबैले, शिल्पा चन्ने, निखील थूल, प्रमोद कुंभारे, अरुण घोटेकर, प्रीतम कुंभारे, श्रीधर खैर, श्याम गावंडे, प्रमोद माथनकर, अरविंद बडे, अजय धोटे, यशवंत गडवार, संजय वंजारी, राम खोकले, राजेश हिंगमिरे आदींसह शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी होते. ‘नो व्हेईलकल डे’ च्या पुढच्या गुरूवारी या मोहिमेमध्ये अनेकांनी सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला.ही रॅली गोकुलधाम मैदानावरून महाविर भवन चौक, डॉ. आंबेडकर चौक, विठोबा चौक मार्गे सुभाष चौक़, कारंजा चौक, तुकडोजी पुतळ्यापासून गोकुलधाम मैदानावर परत आली.(तालुका प्रतिनिधी)