शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

रामनगर येथील ६० भूखंडांचे अखेर लिज नुतनीकरण

By admin | Updated: October 9, 2016 00:37 IST

शहरातील रामनगर येथील लिज धारकांचा मागील २६ वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला.

पंकज भोयर यांची माहिती : वर्धा नगर पालिकेने जाहीर केली यादीवर्धा : शहरातील रामनगर येथील लिज धारकांचा मागील २६ वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला. नगर परिषदेने पहिल्या टप्प्यातील ६० नागरिकांच्या भूखंड लिज नुतनीकरणास परवानगी दिली आहे. तत्सम यादीही पालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. उर्वरित प्रकरणे टप्याटप्याने जाहीर करण्यात येतील, असे न.प. प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी पाठपुरावा केला होता.वर्धा शहरातील रामनगर येथील नागरिकांना राज्य शासनाने लिजवर भूखंडांचे वितरण केले होते; पण १९९१ पासून या भूखंडांचे लिज नुतनीकरण झाले नव्हते. यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते; पण नुतनीकरणाचा प्रश्न निकाली निघत नव्हता. नागरिकांची अडचण लक्षात घेत आ. भोयर यांनी मुख्यमंत्री, नगर विकास राज्यमंत्री, नगरविकास विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेवरून नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी याबाबत मुंबई येथे बैठक बोलविली. बैठकीला आ.डॉ. भोयर, भाजपा नेते प्रदीप ठाकूर, न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया, न.प. पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या प्रश्नावर गांभीर्याने चर्चा झाली. अखेर नगर विकास मंत्रालयाने १९९१ पासून प्रलंबित असलेल्या नुतनीकरणास मान्यता देत ३० वर्षांची मुदतवाढ दिली. तथापि, येथील नागरिकांच्या भूखंडांचे लिज नुतनीकरणास मान्यता देण्यात आल्याने नगर परिषदेद्वारे लिज त्याबाबत कार्यवाही करण्यात आली; पण काही अडचणींमुळे हा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत आ. भोयर यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर तो निकाली निघाला. पालिकेने मंगळवारी पहिल्या यादीत ६० नागरिकांना भूखंड नुतनीकरणास परवानगी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)यांना मिळाला दिलासापहिल्या टप्प्यात सीताराम रेवतकर, शांतीकुमार लसणे, ताईबाई पळसापुरे, बापुराव भुसारी, रतन अग्निहोत्री, शंकर कुबडे, श्यामराव खोडके, अनुसया गडेकार, दामोधर गोडे, नरहरी कोमटी, हरिभाऊ गोलावार, विमल भुते, जयवंत देशकर, विनायक काळे, बाजीराव खुणकर, अमृत घाडगे, केशव डाखोळे, श्रीधर फरसोले, प्रभु मून, दत्तात्रय मुंडे, दशरथसिंह चव्हाण, अशोक श्रीरंगवार, पांडुरंग ठाकरे, शंकर बाराहाते, निळकंठ चौधरी, चंपतराव सालंकार, श्यामराव दरणे, गोविंद गव्हाणे, गणपत उमरे, कमलाप्रसाद तिवारी, सदाशिव पडोळे, वामन बोंडे, मानिकचंद धनुस्कर, ओंकार चवडे, गोविंद मांडवगडे, पार्वता परांजपे, दादा नाखले, नारायण काळे, प्रमोद बाळसराफ, मनोहर कोठेकार, सरस्वती सवाणे, रमा रोडे, राजेंद्र रोडे, कुसूम वानखेडे, शांता चौधरी, सिताराम दाते, कपिलदेव सेंगर, श्याम मरघडे, श्याम भाटे, चंपत ठमेकर, शकुंतला गडेकार, शरद गडेकार, वसंत पळसापूरे, भैया पळसापूरे, यादव लोखंडे, तारा पळसापूरे यांचा समावेश आहे.