शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाच्या वेधशाळेला शेवटचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:52 IST

हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी असलेली पाटबंधारे विभागाची वेधशाळा गेल्या सहा वर्षांपासून बंदिस्त असल्यामुळे शेवटचे वेध लागल्याची स्थिती दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेधशाळा नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : सहा वर्षांपासून कुलूप ‘जैसे थे’

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी असलेली पाटबंधारे विभागाची वेधशाळा गेल्या सहा वर्षांपासून बंदिस्त असल्यामुळे शेवटचे वेध लागल्याची स्थिती दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेधशाळा नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत ठरत आहे.पाटबंधारे विभाग वर्धा यांच्या अंतर्गत आष्टी तलावाच्या परिसरात लघु सिंचन उपविभागाने १९८४ मध्ये वेधशाळा उभारली. निसर्गरम्य वातावरणात टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या वेधशाळेत पाटबंधारे विभाग बाराही महिने कर्मचारी कार्यरत ठेवत होते. २०१२ पर्यंत एक कर्मचारी परिवारासह येथे वास्तव्याला होते. त्यानंतर येथे कुणीही आले नाही. कुलूपबंद अवस्थेत फाटक लावून आहे. गाजर गवत आणि रायमुन्यांच्या वेलीने येथे ताबा घेतला आहे. आष्टी तालुक्यामध्ये महत्त्वाचे योगदान असलेली ही वेधशाळा आज मात्र हवामानाचा अंदाज वर्तविण्याऐवजी स्वत:च्या भविष्याचाच वेध सांगत आहे. १९८४ साली वेधशाळा सुरू झाल्यावर पर्जन्यसृष्टीचा अंदाज तंतोतंत खरा ठरायचा. पाणी किती आले त्याची नोंद मिलिमिटरमध्ये व्हायची. किती दिवस कसे वातावरण राहील यासह खुप सारी माहिती विचारायला शेतकरी यायचे. मात्र या साºया आनंदाला ग्रहण लागते आणि झिरो बजेट खर्चाची वेधशाळा आज बंदिस्त जीवन जगत आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्यातील विश्वासाची दरीही वाढत गेल्याने वेधशाळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत गेले.साहित्य गेले चोरीलावेधशाळेचे सर्व उपकरण नादुरुस्त आहे. काही उपकरण चोरीला गेले. यामध्ये सुर्य प्रखरता बॉल, बोर्ड, पारे या वस्तुंचा समावेश आहे. याप्रकरणी उपविभागीय अभियंता दामोदरे, शाखा अभियंता वाघ यांना संपर्क केला असता भ्रमणध्वनी उचलला नाही. सदर वेधशाळा तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.