शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भू-दिव्यांचे पॅनल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:45 IST

सुरक्षित वाहतुकीकरिता सिमेंट तथा डांबरी रस्त्याला खिळ्यांनी ठोकून अ‍ॅक्टीव्ह लाईट अर्थात रेडीयमयुक्त दिशा निर्देशन करणारे सोलर पॅनलचे भू-दिवे तीन महिन्यांपूर्वी लावले होते. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पॅनेल्स आला रस्त्यावरून गायब झाले आहे.

ठळक मुद्देरेल्वे उड्डाणपुलावरील प्रकार : अपघाताची शक्यता पुन्हा बळावली

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सुरक्षित वाहतुकीकरिता सिमेंट तथा डांबरी रस्त्याला खिळ्यांनी ठोकून अ‍ॅक्टीव्ह लाईट अर्थात रेडीयमयुक्त दिशा निर्देशन करणारे सोलर पॅनलचे भू-दिवे तीन महिन्यांपूर्वी लावले होते. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पॅनेल्स आला रस्त्यावरून गायब झाले आहे. ते काढून नेले असल्याची शक्यता आहे. ते कसे गायब झाले, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.सुमारे ४०० पैकी आता अर्धेधिक पॅनेल्स रस्त्यावर नाहीत. यामुळे दिवस-रात्र चमकत राहणारे हे दिशानिर्देशन देणारी एक साखळी दिव्याची रांग आता तुटक स्वरूपात आली आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीकोनातून लावलेले दिवेच गायब झाल्याने त्या विचारालाच हरताळ फासला गेल्याचे दिसून येत आहे. या विषयाकडे अद्याप संबंधित विभागाने लक्ष न घातल्याने दुर्लक्षितच राहील आहे.शहरातील मुख्य रस्ता तुकडोजी चौकातून रेल्वे उड्डाणपूलावरून शहराबाहेर जातो. नांदगाव चौकाकडे जाणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ ला जुळतो. नांदगाव, वर्धा, पांढरकवडा आणि तालुक्याच्या ग्रामीण भागाला ये-जा करण्यासाठी दुचाकीधारक, कार व हलकी-मध्यम वाहतूक करणारी असंख्य वाहनांची मोठी वर्दळ सतत या पुलावरून सुरू असते. हा पूल वळणाचा असल्याने अनेकांची वाहने वळण घेताना उंचवटा असलेल्या पादचारी मार्गाला धडकल्याचे लक्षात येते. यामुळेच तेथे रस्त्याच्या दोन्ही कडेला रेडीयमचे दिवस-रात्र चमकणारे अ‍ॅक्टीव्ह लाईट रस्त्यावर खिळ्याद्वारे ठोकण्यात आले होते. वळणाची योग्य दिशा त्वरित लक्षात यावी आणि अचूक अंदाजाने वाहने वळती व्हावी, हा यामागील हेतू होता. हे घुटक्यासाखे दिसणारे भू-दिवे साधारणत: ५ फुटांवर दोन-तीन महिन्यांपूर्वी लावण्यात आले होते; पण आता अर्ध्यापेक्षा कमीच रेडीयम दिवे शिल्लक राहिले आहेत. सुमारे ४०० दिव्यांपैकी १५० दिवेच राहिल्याने तेथील सुरक्षित वाहतूक या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. उर्वरित दिवेही गायब होणार नाही, हे सांगता येणे कठीणच आहे. या प्रश्नाकडे संबंधित विभागाने फारसे लक्ष दिले नसल्याने तो दुर्लक्षितच राहिला आहे.या पुलावर आतापर्यंत अनेक अपघात झालेत. यात अनेकांना मरण पत्करावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले. याच मार्गावरून परिसरातील विद्यार्थी, पालक, नागरिक यांची मोठी गर्दी असते. शिवाय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी वाहनेही याच रस्त्याने ये-जा करतात. परिसरात दोन मोठ्या शाळा असल्याने विद्यार्थी व पालकांची चांगलीच गर्दी असते. यापूर्वी झालेले अपघात व त्यातील मृतकांची संख्याही लक्षणीय आहे. यामुळेच सुरक्षित वाहतुकीसाठी हे भू-दिवे लावण्यात आले होते; पण अर्ध्याधिक दिवे बेपत्ता झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे दिवे कुणी चोरले तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. संबंधित विभागाने ही बाब गांभीर्याने घेत पुन्हा रेडियमचे दिवे लावणे गरजेचे झाले आहे. अपघात टाळण्याकरिता किमान उड्डाण पुलावर तरी अ‍ॅक्टीव्ह लाईट लावून दिलासा देणे गरजेचे झाले आहे.सुरक्षित वाहतुकीकरिता अ‍ॅक्टीव्ह लाईटची गरजशहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, पुलावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळविता यावे, विद्यार्थी, पालकांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून तुकडोजी चौक, रेल्वे उड्डाणपूल तथा अन्य मार्गांवर अ‍ॅक्टीव्ह लाईट लावण्यात आले होते; पण यातील बहुतांश लाईट चोरीस गेले आहेत. यामुळे सुरक्षित वाहतुकीचा उद्देश्यच लयास गेल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाचे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पुन्हा अपघात बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.