शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गणेशोत्सवातून वाढला रोजगार बाजारात लाखोंची उलाढाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 14:34 IST

Wardha : वाजंत्री, मंडप डेकोरेशन, केटरर्स, आचारी, व्यावसायिक, पुरोहित व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात २५३ सार्वजनिक गणेशोत्सव, ७८ गावांत 'एक गाव, एक गणपती', तर १३ हजार १८५ घरी बाप्पा विराजमान झाले. यामुळे भाविकांत व बाजारात नवचैतन्य संचारले आहे. बाप्पाच्या आगमनाने रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. व्यावसायिक, वाजंत्री, मंडप, डेकोरेशन, फळ, फूलविक्रेते, केटरर्स, आचारी, पुरोहित व्यस्त आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. गणेशोत्सवाच्या चार दिवसांत लाखोंची उलाढाल झाली आहे.

जिल्ह्यात गणेशोत्सव सुरु झाल्यापासून फूटपाथपासून मोठ्या व्यावसायिकांपासून सर्वांना अर्थप्राप्तीचे साधन प्राप्त झाले. अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटतो आहे. तसेच दोन पैसे गाठीशी बांधता यावे, यासाठी धडपड सुरू आहे. गणेशोत्सव सुरू होऊन चार दिवस लोटले; परंतु अद्यापही बाजारात गर्दी होत आहे. शहरात तीन दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

प्रत्येक घटकाला होतेय अर्थप्राप्ती गणेशोत्सवानिमित्ताने मूर्तिकार, वाजंत्री, मंडप, डेकोरेशन, केटरर्स, आचारी, पुरोहित, फळ व फूल विक्रेते, किराणा, अन्य किरकोळ व फुटपाथ व्यावसायिक, मोठे व्यावसायिक तसेच उत्सवांशी निगडित प्रत्येक घटकाला अर्थप्राप्ती होत आहे. गणेशोत्सवात कलाकार, मंडप डेकोरेशन, नेपथ्यकार, वाद्यवृंद, हॉटेल, मेवा- मिठाई आदींच्या रोजगारात भर पडली आहे.

रोजगार व व्यवसायाला चालना देणारा उत्सव जिल्ह्यात यंदा एकूण१३ हजार ४३८ गणेशमूर्तीची स्थापना झाली. ही संख्या गृहीत धरली तर या माध्यमातून होणारी उलाढाल सहजच लक्षात येते.खरेदी-विक्री वाढल्याने व्यापारी व व्यावसायिकांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे रोजगार व व्यवसायास चालना मिळत आहे. सर्वांच्या उदरनिर्वाहाची चिंता बाप्पाच्या आगमनाने दूर झाली आहे.

खेळणी व खाद्यपदार्थांची रेलचेल गणेशोत्सवानिमित्त मोदक, लाडू, केळी, काकडी, अन्य फळ, भेल, आइस्क्रीम, पाणीपुरी, चाट, डोसा, कॉर्न, पॉपकॉर्न, गोबी मंच्युरियन अश पदार्थाची मागणी वाढली आहे. राजस्थानी खेळणीची दुकाने सजली, तर बेन्टेक्स ज्वेलरी व्यवसायही जोमात आहे. पूजा साहित्यासह मिठाईच्या दुकानांत गर्दी होत असल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसून येत आहे.

एकता व बंधुभावाचे दर्शन गणेशोत्सवातून एकता व बंधुभावाचे दर्शन होत आहे. यंदा 'सावंगीचा राजा' या प्रतिष्ठानने पर्यावरणपूरक मंदिराची प्रतिकृती, तर अनेक मंडळांनी विविध पर्यावरणपूरक देखावे व प्रतिकृतींचे सेट तसेच मंडप व लायटिंग डेकोरेशन डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत.  

टॅग्स :wardha-acवर्धाGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024