शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लाखो लिटर पाणी जाते वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:48 IST

रबी हंगामासाठी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे; पण उपकालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आली नाही.

ठळक मुद्देसदोष पाटचऱ्यांचा परिपाक : साफसफाई तथा दुरूस्तीकडे विभागाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेवाग्राम : रबी हंगामासाठी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे; पण उपकालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी, पिकांऐवजी अन्य वनस्पतीचे संवर्धन होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय लाखो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे दिसून येत आहे.सेवाग्राम-हमदापूर मार्गाजवळून महाकाली धरणाचा कालवा गेला आहे. या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. तरोडा शिवार आणि मधे येणाºया गावांतील शेतीला या पाण्यामुळे फायदा झाला. शेतकरी कपाशी, तूर, हरभरा आणि गहू या पिकांना पाणी देतात. कालव्याच्या पाण्यामुळेच शेतकऱ्यांना रबी पिके घेण्याची संधी मिळाली आणि आर्थिक उत्पन्नात भर पडू लागली. सध्या तरी कापसाचे उत्पन्न समाधानकारक नसल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हरभरा आता शेतात असून शेतकरी कालव्याचे पाणी देत आहेत. पाणी पिकांसाठी संजीवनी असल्याने त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे; पण लघु पाटबंधारे विभाग कालवा, उपकालवा आणि पाटचºयांबाबत गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आले. उपकालवा व पाटचऱ्यांतून शेतात पाणी आले; पण उपकालवा व पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम, दुरूस्तीकडे लक्ष नसल्याने पाणी अस्ताव्यस्त पसरत असल्याचे दिसून येत आहे. सखल भाग, खड्डे यातून पाणी भरून वाहत असल्याने पिकांपेक्षा रानगवताचेच संवर्धन होत असल्याचे खरांगणा गोडे परिसरात दिसून येत आहे. नादुरूस्ती पाटचऱ्या, उपकालव्यांमुळे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.निधीचे रडगाणे सुरूचजिल्ह्यातील सिंचन व्यवस्था सांभाळता यावी म्हणून पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक विभागातील प्रकल्प एकेका कार्यालयाला विभागून देण्यात आले. शिवाय कालवे विभागांचीही निर्मिती करण्यात आली; पण या विभागांना निधीच दिला जात नसल्याची ओरड तेथील अधिकारी करतात. परिणामी, कालवे, उपकालवे, पाटचऱ्यां यांची देखभाल, दुरूस्ती होत नसल्याचेच दिसून येत आहे. पाणी वापर संस्थाही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसते. परिणामी, शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळत नसून ते भलतीकडेच वाहून जात असल्याचे दिसते. हा प्रकार टाळणे गरजेचे झाले आहे.