शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाघाची ओळख पटविण्यासाठी ‘समन्वयाचा अभाव’ ठरतोय अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 05:00 IST

ट्रॅप कॅमेऱ्यात नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा एक तरुण वाघ ५ मार्चला कैद झाला. त्यानंतर या वाघाने आंजी (मोठी) शेत शिवारापर्यंत जात यू-टर्न घेत पुन्हा पवनार शिवार गाठून पुन्हा गो-वंशाची शिकार केली. त्यानंतर पुन्हा वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला. हेच छायाचित्र वाघाची ओळख पटावी म्हणून पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहे. पण वन्यजीव संरक्षण विभागाकडून पाहिजे तसा प्रतिसादच मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ थेट वर्धा शहराशेजारील पवनार शेत शिवारापर्यंत पोहोचलेल्या तरुण वाघास मागील पंधरा दिवसांपासून हुडकून काढण्यात वनविभागाला यश आलेले नाही. असे असले तरी हा तरुण वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा वाघ नेमका कोण याची अधिकची माहिती मिळावी म्हणून वनविभागाच्या वतीने काही छायाचित्र नागपूर येथील वन्यजीव संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. पण २८ दिवस लोटूनही वाघाची ओळख पटलेली नाहीच. वन आणि वन्यजीव संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभावच या तरुण वाघाची ओळख पटविण्यासाठी अडथळा ठरत असल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी दोन्ही विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे.

शिकारीनंतर ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला टायगर-    पवनार येथील शेत शिवारात गो-वंशाची शिकार झाल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात सुरुवातीला घटनास्थळ गाठून अधिकची माहिती घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले. याच ट्रॅप कॅमेऱ्यात नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा एक तरुण वाघ ५ मार्चला कैद झाला. त्यानंतर या वाघाने आंजी (मोठी) शेत शिवारापर्यंत जात यू-टर्न घेत पुन्हा पवनार शिवार गाठून पुन्हा गो-वंशाची शिकार केली. त्यानंतर पुन्हा वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला. हेच छायाचित्र वाघाची ओळख पटावी म्हणून पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहे. पण वन्यजीव संरक्षण विभागाकडून पाहिजे तसा प्रतिसादच मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

उघड्या विहिरी, विद्युत प्रवाहित तारा धोक्याच्या-   नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा तरुण वाघ पवनार शिवारात दर्शन झाल्यानंतर १९ मार्चपासून हा तरुण वाघ बेपत्ता आहे. तो आल्या मार्गाने परत गेला असावा किंवा तो बोर व्याघ्र प्रकल्पातील घनदाट जंगलात गेला असावा असा अंदाज काहींकडून वर्तविला जात आहे. असे असले तरी शेत शिवारांमधील उघड्या विहिरी तसेच प्रवाहित विद्युत तारा या नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणाऱ्या वाघासाठी धोक्याच्याच आहेत.

तो बीटीआर-८ अन् बीटीआर-१० नव्हेच-    पवनार ते आंजी (मोठी) व आंजी (मोठी) ते पवनार असा प्रवास करणारा हा वाघ बोर व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-८ किंवा बीटीआर-१० नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :Tigerवाघ