शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
2
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
3
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
4
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
5
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
6
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
7
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
8
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
9
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
10
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
11
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
12
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
13
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
14
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
15
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
16
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
17
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
18
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
19
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
20
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा

कारंजा पंचायत समितीला २२ शिक्षकांची कमतरता

By admin | Updated: June 15, 2015 02:06 IST

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९५ प्राथमिक शाळा, २० खासगी माध्यमिक शाळा आणि १३ इंग्रजी कॉन्व्हेंट अशा एकूण १२८ शाळा आहेत.

नियमित गटशिक्षणाधिकारी नाही : सर्व शिक्षा अभियानात होते तारांबळअरुण फाळके कारंजा (घा.)तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९५ प्राथमिक शाळा, २० खासगी माध्यमिक शाळा आणि १३ इंग्रजी कॉन्व्हेंट अशा एकूण १२८ शाळा आहेत. या शाळांची प्रशासकीय देखभाल करण्यासाठी कारंजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात २०१३ पासून नियमित गटशिक्षणाधिकारी नाही. शिवाय २२ शिक्षकांचीही कमतरता आहे. यामुळे शिक्षण विभागाचा डोलारा कसा सांभाळला जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पंचायत समितीमध्ये एक विस्तार अधिकारी, एक वरिष्ठ सहायक आणि एक केंद्रप्रमुख तसेच २२ शिक्षक कमी आहे. या विपरित स्थितीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी.बी. उमेकर हे आपल्या विस्तार अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळून संपूर्ण तालुक्यातील शिक्षण प्रशासनावर नियंत्रण ठेवणे तसेच सर्व शिक्षा अभियानाला गतीमान ठेवणे आदी कामे पार पाडत आहे. हे करीत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उपलब्ध शिक्षक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन डी.बी. उमेकर सर्व शिक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या कार्यक्षमतेला मर्यादा आहेत. हे ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित कारंजा पंचायत समितीला कमी असलेले शिक्षक, कर्मचारी व नियमित अधिकारी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. तशी पालकांतूनही मागणी जोर धरत आहे.कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९५ प्राथमिक शाळांकरिता २३५ शिक्षकांची पदे मंजूर आहेत; पण केवळ २१३ शिक्षक कार्यरत आहेत. तब्बल २२ शिक्षकांची कमतरता आहे. चार विस्तार अधिकाऱ्यांची, दोन वरिष्ठ सहायक आणि १० केंद्र प्रमुखांची पदे मंजूर असताना सध्या अनुक्रमे तीन, एक आणि नऊ कार्यरत असून एक विस्तार अधिकारी, एक वरिष्ठ सहायक आणि एक केंद्रप्रमुख कमी आहेत. १ जुलै २०१३ रोजी गटशिक्षणाधिकारी बोलके यांची अमरावती येथे बदली झाली. तेव्हापासून आजपर्यंत कारंजा पंचायत समितीला नियमित गटशिक्षणाधिकारी मिळालेला नाही. पद रिक्त असून प्रभारी म्हणून विस्तार अधिकारी डी.बी. उमेकर कार्यभार सांभाळत आहेत. विस्तार अधिकारी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी, अशी दुहेरी भूमिका व कामकाज सांभाळताना त्यांची तारांबळ उडत असल्याचे दिसते. गतवर्षी ३० सप्टेंबर रोजी जि.प. शाळांची पटसंख्या ५ हजार ८१९ होती. पाल्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशिक करण्याचा पालकांचा कल वाढला आहे. या विपरित परिस्थितीतही उमेकर यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रभावीपणे विशेष पालक संपर्क अभियान राबविले. यात मागील वर्षीची पटसंख्याच नव्हे तर वाढविणे हा त्यांचा प्रयत्न होता. यास प्रतिसादही चांगला मिळत आहे; पण कर्मचाऱ्यांची उणीव जाणवत असल्याचे दिसते. जि.प. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत कारंजा तालुक्यातील पदे भरणे गरजेचे झाले आहे.