शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३६ एचआयव्हीसह टीबी ग्रस्तांनी हरविले कोविड-१९ विषाणूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ५७६ टीबीग्रस्त आहेत. त्यापैकी ३५२ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर २८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. या २८ कोविड बाधितांपैकी २७ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर एका टीबीग्रस्त कोविड बाधिताचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 

ठळक मुद्देलक्षण आढळताच केली जातेय कोविड चाचणी

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोनाचा धोका मोठा असल्याने टीबी आणि एचआयव्ही सोबत जगणाऱ्या व्यक्तींचीही जिल्ह्यात कोविड चाचणी केली जात आहे. एखादी एचआयव्ही तसेच टीबीग्रस्ताला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान होताच त्याला चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे. आतापर्यंत ३७ टीबी आणि एचआयव्ही ग्रस्तांना कोरोना संसर्ग झाला असून त्यापैकी ३६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात ५७६ टीबीग्रस्त आहेत. त्यापैकी ३५२ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर २८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. या २८ कोविड बाधितांपैकी २७ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर एका टीबीग्रस्त कोविड बाधिताचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात २ हजार १०० व्यक्ती एचआयव्ही सोबत जीवन जगत आहेत. त्यापैकी ३१८ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर नऊ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला. या एचआयव्ही ग्रस्तांना वेळीच औषधोपचार मिळाल्याने ते कोविडमुक्त झाले आहे.

लक्षण आढळताच केली जातेय कोविड चाचणीनियमित औषधोपचार घेण्यासाठी रुग्णालयात आल्यावर एचआयव्ही सोबत जीवन जगणाऱ्या व्यक्तीची तातडीने कोविड चाचणी केली जाते. तर टीबी सोबत जीवन जगणाऱ्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याची तातडीने कोविड चाचणी केली जात आहे.

अतिजोखिमेच्या व्यक्तींवर अधिकाऱ्यांची करडी नजरजिल्ह्यात २ हजार १०० व्यक्ती एचआयव्हीसोबत तर ५७६ व्यक्ती टीबीसोबत जीवन जगत आहेत. या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीच कमी राहत असल्याने त्यांना कोरोना संकटाच्या काळात अतिजोखीमीची व्यक्ती म्हणून निश्चित करण्यात आले आहे. असे असले तरी तालुका स्तरासह जिल्हा स्थळावरील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी या व्यक्तींवर करडी नजर ठेवून असल्याचे सांगण्यात आले. 

ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्याचा आरोग्य विभाग तसेच यंत्रणेतील प्रत्येक व्यक्ती कोविडशी लढा देत आहे. आतापर्यंत एचआयव्ही व टीबीसोबत जीवन जगणाऱ्या ३७ व्यक्तींचा कोरोना संसर्ग झाला असला तरी त्यापैकी ३६ व्यक्ती कोविडमुक्त झाले आहेत. डॅा. अजय डवले,जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य