शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

घर कोसळल्याने कोंडवाड्याचा आसरा

By admin | Updated: March 10, 2016 02:59 IST

कोणताही गरीब घरकुलापासून वंचित राहू नये हा शासनाचा प्रामाणिक आहे. असे असतानाही विरूळ (आ.) येथील गरीब कुटुंबावर

जगण्याची अगतिकता : बीपीएलधारक असताना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ नाहीसचिन देवतळे विरूळ(आकाजी)कोणताही गरीब घरकुलापासून वंचित राहू नये हा शासनाचा प्रामाणिक आहे. असे असतानाही विरूळ (आ.) येथील गरीब कुटुंबावर राहते घर कोसळल्याने चक्क जनावरांच्या कोंडवाड्याचा आसरा घेत राहण्याची वेळ आली आहे. येथील गजानन जवने हे पत्नी, मुलगा व मुलीसोबत राहतात. तीन वर्षापूर्वी पावसाळ्यात त्यांचे राहते घर पूर्णत: कोसळले. त्यामुळे एकाच दिवसात त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने भाड्याच्या घरात राहणे त्यांना परवडणार नव्हते. तसेच हाती पैसा नसल्याने घरही बांधणे त्यांना शक्य नाही. परिणामी गावात ज्या कोंडवाड्यात मोकाट गुरे कोंडली जातात त्या कोंडवाड्यात एका कोपऱ्यात या परिवाराला राहण्याची वेळ आली आहे. गत पाच वर्षापासून सदर कुटुंब शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ मिळावा म्हणून आर्वी पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयाच्या चकरा मारत आहे. पण अद्यापही त्यांना घरकूल योजनेचा लाभा मिळालेला नाही. या परिवाराची बिकट परिस्थिती येथील लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपासून लपलेली नाही. असे असतानाही कुणीही या गरीब कुटुंबाकडे लक्ष देण्यात तयार नाही. हक्काचे घरकूल मिळावे यासाठी या कुटुंबाचा आटापीटा सुरू आहे. याच गावातील पांडुरंग चाफले या वृद्ध दाम्पत्याचे घरही दोन वर्षापूर्वी पूर्णत: कोसळले. सोबतच येथील छबुबाई बुरे यांचेही घर पूर्णत: मोडकळीस आले आहे. ही तीनही कुटुंबे दोन ते तीन वर्षापासून घरकुल योजनेची वाट पाहावी लागत आहे. गत काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा सामना सर्वांनाच कारावा लागत आहे. वचेवर गारपीटही होत आहे. त्याचा त्रासही सदर कुटुंबांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या कुटुंबाला घरकूल योजनेचा फायदा करून देण्याची मागणी गावकरी करीत आहे.