वर्धा : मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरून अज्ञात युवकाने चाकू हल्ला करून योगेश पुणेकर याला गंभीर जखमी केले. ही घटना गोंड प्लॉट परिसरात गुरूवारी घडली. योगेश घरात झोपून असताना अज्ञात इसमाने घरात शिरून शरीरावर चाकूने वार केले. ही बाब त्याचे वडील हिरालाल त्यांच्या लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी कलम ३२६, ४५२ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास शहर पोलीस करीत आहेत.(स्थानिक प्रतिनिधी)
गोंड प्लॉट परिसरात युवकावर चाकू हल्ला
By admin | Updated: October 30, 2015 02:37 IST