शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा स्मारकाला झुडुपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:46 IST

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहूती देणाºया हुतात्मा जंगलू धोंडबाजी ढोरे यांचे स्मारक स्थानिक सिव्हील लाईन भागात आहे.

ठळक मुद्देसंबंधीताचे दुर्लक्ष : प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहूती देणाºया हुतात्मा जंगलू धोंडबाजी ढोरे यांचे स्मारक स्थानिक सिव्हील लाईन भागात आहे. परंतु, दुर्लक्षीत कारभारामुळे सध्या या स्मारक परिसराला झुडूपाचा विळखा असल्याचे बघावयास मिळते. देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.वर्धेतील जंगलू धोंडबाजी ढोरे यांनी ११ आॅगस्ट १९४२ ला देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्याचे हे कार्य व इतर हुतात्म्यांचे कार्य नवीन पिढीला वेळोवेळी माहीत व्हावे या हेतूला केंद्रस्थानी ठेवून सिव्हील लाईन भागातील हुतात्मा स्मारकाचे गत काही वर्षांपूर्वी सौदर्यीकरण करण्यात आले. सौदयीकरणाच्या कामासाठी शासनाचा मोठा निधीही खर्च करण्यात आला. परंतु, सध्या सदर हुतात्मा स्मारकाकडे देखभालीची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. येथील सिव्हील लाईन भागात असलेल्या हुतात्मा स्मारकात सध्या मोठ्या प्रमाणात झुडूपे वाढली आहेत. त्यात सरपटणाºया प्राण्यांचाही वावर असल्याने अनुचित घटनेला निमंत्रण मिळत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.अनुचित घटनेला मिळतेय आमंत्रणसिव्हील लाईन भागातील हुतात्मा स्मारक परिसरात लहान मुले आपल्या आई-वडील व घरातील वयोवृद्धांसह खेळण्यासाठी येतात. परंतु, सदर हुतात्मा स्मारक परिसरात ठिकठिकाणी झुडुपे वाढली आहेत. इतकेच नव्हे तर या झुडूपांमध्ये सरपटणाºया प्राण्यांचा वावर असल्याने व ते कापण्याकडे संबंधीतांचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे.परिसरात असतेकाळोखाचे साम्राज्यदुर्लक्षीत कारभारामुळे सिव्हील लाईन भागातील हुतात्मा स्मारकाची दैनावस्था झाली आहे. येथे ठिकठिकाणी झुडूपे वाढली असून ती कापण्याकडे दुर्लक्ष केली जात आहे. इतकेच नव्हे तर तेथे तीव्र प्रकाशाचे विद्युत पथदिवेही नाहीत. परिणामी, रात्रीच्या सुमारास या हुतात्मा स्मारक परिसरात काळोखाचे साम्राज्य असते.