शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी ठेवून लोकाभिमुख काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:09 IST

प्रशासनात काम करताना प्रत्येक फाईलमागे एखाद्या गरजू व्यक्तीचे काम आहे, ही माणुसकी जपून लोकाभिमुख काम करावे. शासकीय कामाचा चेहरा हा सामान्य माणूस असावा, असे प्रतिपादन अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

ठळक मुद्देशैलेश नवाल : बदलीनिमित्त प्रशासनाकडून सत्कार, नव्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रशासनात काम करताना प्रत्येक फाईलमागे एखाद्या गरजू व्यक्तीचे काम आहे, ही माणुसकी जपून लोकाभिमुख काम करावे. शासकीय कामाचा चेहरा हा सामान्य माणूस असावा, असे प्रतिपादन अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. वर्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांना विकास भवनात निरोप देण्यात आला. निरोप समारंभाला उत्तर देताना नवाल बोलत होते. यावेळी वर्ध्याचे नवीन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, नवाल, शैलेश नवाल यांच्या मातोश्री, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनुज जिंदाल उपस्थित होते. वर्धा जिल्ह्याची टीम अतिशय चांगली आहे. सर्वांच्या सहकायार्मुळे चांगली कामगिरी करता आली. सेनापतीच्या चांगल्या कामाचे श्रेय जोश आणि उत्साह असणाऱ्या सेनेला आहे, असे ते म्हणाले. संपर्कात येणाºया वर्धेतील प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकायला मिळाले. माझ्या व्यक्तिमत्त्व विकासात तुम्हा सर्वांचा वाटा आहे. असे नवाल यावेळी म्हणाले. कामाचा ताण सर्व कर्मचाऱ्यांनी वाटून घेतल्यामुळे कुटुंबासाठी पण चांगला वेळ देता आला, असेही त्यांनी नमूद केले. आपणा सर्वांकडून झालेले कौतुक पाहून दरवर्षी बदली व्हावी, अशी गमतीशीर प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार म्हणाले, शैलेश नवाल यांनी चांगली टीम तयार केली आहे. कमी मनुष्यबळामध्ये त्यांनी जिल्ह्याला सर्व योजनांच्या अंमलबजावणीत अग्रेसर ठेवले. त्यांनी केलेली कर्मचाºयांची क्षमता वृद्धी मला निश्चितच उपयुक्त ठरेल. यापुढेही वर्धा जिल्ह्य सर्व बाबतीत पुढे राहील असे काम सर्व मिळून करू या. प्रशासकीय सेवा दिलेला जिल्हा कायम प्रगती आणि विकास करतोय याचा आनंद आणि समाधान देण्याचा प्रयत्न आपण करूया असे भिमनवार यावेळी म्हणाले. कमी कर्मचारी आणि अधिकारी असतानाही जिल्ह्याने शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वेळी चांगली कामगिरी केली. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि कामासाठी त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारही मिळाला आहे असे मनोगत अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी व्यक्त केले. यावेळी चतुर्थ श्रेणी संघटनेच्या वतीने चंदू कावळे शिपाई, महसूल कर्मचारी संवर्ग, वाहनचालक संवर्ग, नायब तहसीलदार संवर्ग, तहसीलदार संवर्ग, उपजिल्हाधिकारी संवर्ग, यांच्या वतीने शैलेश नवाल यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्या मातोश्रींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक कर्मचारी आणि अधिकाºयांंनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी