शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कामगंध सापळे निष्प्रभ; बोंडअळीचे सावट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:42 IST

मागील वर्षीच्या बोंडअळीच्या नुकसानीचा कडू अनुभव पाठीशी असतानाही रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी दुसरा चांगला पर्याय उपलब्ध नसल्यामुळे कापसाची मोठ्या प्रमाणात यावर्षीही लागवड केली. कापसाचे पीक पाती- फुले बहरले असतानाच पुन्हा याहीवर्षी अनेकांच्या कापूस पिकात बोंडअळीचा प्रार्दुभाव दिसला.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : कपाशीची वाढ खुंटली

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : मागील वर्षीच्या बोंडअळीच्या नुकसानीचा कडू अनुभव पाठीशी असतानाही रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी दुसरा चांगला पर्याय उपलब्ध नसल्यामुळे कापसाची मोठ्या प्रमाणात यावर्षीही लागवड केली. कापसाचे पीक पाती- फुले बहरले असतानाच पुन्हा याहीवर्षी अनेकांच्या कापूस पिकात बोंडअळीचा प्रार्दुभाव दिसला. शेतकऱ्यांनी ओरड सुरू केली. कृषी विभागाने शेत शिवार पाहणी करीत कामगंध सापळे लावण्याचा व फवारणीत निंबोळी अर्काचा वापर करण्याचा सल्ला दिला. एक महिनाभऱ्यापासून शेतकरी कृषी विभागाचा सल्ला अंगीकारत आहे. पण कामगंध सापळ्यांचा फारसा उपयुक्त परिणाम दिसून येत नसल्याचे शेतकरी सांगत असून बोंडअळीचे सावट कायम असल्याचे ऐकायला मिळत आहे.कामगंध सापळ्यातील कॅप्सूलच्या वासाकडे बोंडअळीचा नर सापळ्यात अडवतो. त्यामुळे पुढील प्रजनन व होणारा विस्तार थांबतो असा कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावले. प्रत्येक फवारणीत निंबोली अर्काचा वापर केला. पण रोहणा परिसरात अनेक शेतकरी सापळ्यातील बोंडअळीच्या किडीचे नर जमा न झाल्याचे सांगत आहे. बºयाच शेतात बोंडअळीचा प्रभाव कायम असल्याचे निदर्शनास येत आहे.पीकवरून पाहण्यासाठी उत्तम दिसत असल्याने शेतकरी रासायनीक खते, फवारणी, निंदन, डवरणी यावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत असला तरी भविष्यात बोंडअळीचा प्रभाव वाढला व मागच्या वर्षीचीच अवस्था झाली तर कापसाच्या उत्पन्नात किती तोटा येईल. या कल्पनेने अस्वस्थ असल्याचे दिसत आहे.जूनच्या सुरुवातीच्या पावसानंतर पेरणी केलेले कापसाचे पीक दुरून पहायला खुप चांगले दिसत आहे. ही काहीशी समाधानाची बाब असली तरी सुरुवातीच्या पावसानंतर १५-२० दिवसाचा खंड पडल्याने अनेक शेतकºयांना २६ जून नंतर कापसाची लागवण करावी लागली. अशा उशीरा लागवड झालेल्या कापसाच्या शेतातील पिके फारशी वाढली नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती