शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

४० हजारांसाठी केली सुखरामची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:31 IST

परडा पाटी जवळील तास रोडवर सुखराम गोडघाटे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात समुद्रपूर पोलिसांना यश आले असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या ४० हजारांसाठी सुखरामची हत्या करण्यात आल्याचे तसेच मृतकानेच वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती.......

ठळक मुद्देदोघांना अटक : मृतानेच दिली होती वडिलांना मारण्याची सुपारी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : परडा पाटी जवळील तास रोडवर सुखराम गोडघाटे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात समुद्रपूर पोलिसांना यश आले असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या ४० हजारांसाठी सुखरामची हत्या करण्यात आल्याचे तसेच मृतकानेच वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. सुनील जगदीश ठक (३२) रा. आरंभा व हनुमान महादेव झाडे (४५) रा. भद्रावती असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.सुखराम गोडघाटे व वडील शालिक गोडघाटे यांचा जानेवारी १९ मध्ये शेतीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून पोलीस कचेरीत तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. तेव्हापासून सुखराम चिडून सुनील ठक याला १० हजारात वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती; पण आरोपींनी त्यांना मारले नाही. ६ मार्चला हिंगणघाटच्या सराफा व्यावसायिकाला शेती विकण्यासाठी सुखराम हा आरोपी सुनील ठक याच्यासोबत दुचाकीने गेला होता. तेथे शेतीचे इसार पत्र करुन त्याचेकडून ४० हजार इसार घेवून दोघेही नंदोरी येथे आले. तेथे दारू पिऊन ते भद्रावतीकडे दुचाकीने रवाना झाले. भद्रावती येथे सुनीलने आपला जावाई हनुमान झाडे याला बोलविले. तिघेही तेथे दारू पिऊन वरोरा येथे जेवण करून गावाला परत आले. या काळात सुखरामला दारू पाजून त्याचे जवळील पैसे काढण्याचा बेत होता. मात्र, ते पैसे सुनीलने काढले नाही. जेव्हा तिघेही आरंभा येथे आले तेव्हा सुखरामला घराजवळ सोडून सुनील व हनुमान उभे असताना हनुमानने सुनीलला विचारले की पैसे काढले का, तेव्हा नाही म्हटले. तेव्हा हनुमान याने मी भद्रावती वरुन पैशासाठी आलो. तेव्हा पुन्हा सुखरामला फोन करुन दारू प्यायचे आहे, असे सांगुन बोलाविले. त्यानंतर सुनीलने दुचाकी चालविण्यापूर्वी मृतकाला मधात बसवून मागे हनुमानला बसचिले. परडा पाटीकडे गाडी आणून तास रोडवर हनुमानने सुखरामचा गळा दुपट्ट्याने आवळला. दरम्यान तिघेही दुचाकी वरुन पडले. त्यानंतर सुखराम जवळील ३६ हजार रुपये घेवून आरोपींनी पोबारा केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी ३१ हजार रुपये जप्त करून त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. पुढील तपास ठाणेदार मुडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मिलिंद पारडकर, रवी वर्मा, धर्मेंद्र तोमर, अरविंद येणूरकर आदी करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी