शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘कदम’ कुटुंबीयांनी लावला मोबाईल टॉवर कंपनीला कोटींचा चुना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या कदम कुटुंबीयांनी नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर अतिक्रमण केल्याचे आणि याच अतिक्रमण जागेवर सुरक्षा भिंत बांधल्याचे पुढे आले. त्यानंतर प्रभारी मुख्याधिकारी विजय देवळीकर यांच्या मार्गदर्शनात पालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अतिक्रमणीत जागेवरील सुमारे २५ वर्षे जुनी कदम हॉस्पिटलची सुरक्षा भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडली. हीच अतिक्रमण माेहीम राबविली जात असताना सुरक्षा भिंतीच्या आत एक टॉवर असल्याचे पुढे आले.

महेश सायखेेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटल मधील नियमबाह्य गर्भपातामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. तर याच कदम हॉस्पिटलच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून अतिक्रमण जागा आपलीच असल्याचे भासवून एका मोबाइल टॉवर कंपनीला कोटींचा चुना लावल्याचे आता पुढे आले आहे. याप्रकरणी अद्यापही टॉवर कंपनीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी आर्वी नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान हे वास्तव उलगले आहे.बायो मेडिकल वेस्टची स्वत:च विल्हेवाट लावली जात असल्याने आर्वी येथील कदम हॉस्पिटलला आर्वी नगरपालिका प्रशासनाने यापूर्वी दंडात्मक कारवाई का करू नये? असा नोटीस बजावला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आर्वी नगरपालिका प्रशासनाने कदम हॉस्पिटलच्या संचालकांनी अतिक्रमण तर केले काय याची शहानिशा केली. याच शहानिशेदरम्यान अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या कदम कुटुंबीयांनी नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर अतिक्रमण केल्याचे आणि याच अतिक्रमण जागेवर सुरक्षा भिंत बांधल्याचे पुढे आले. त्यानंतर प्रभारी मुख्याधिकारी विजय देवळीकर यांच्या मार्गदर्शनात पालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अतिक्रमणीत जागेवरील सुमारे २५ वर्षे जुनी कदम हॉस्पिटलची सुरक्षा भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडली. हीच अतिक्रमण माेहीम राबविली जात असताना सुरक्षा भिंतीच्या आत एक टॉवर असल्याचे पुढे आले. अधिकची माहिती घेतल्यावर हे टॉवर आर्वी नगरपालिकेच्या खुल्या जागेवर असल्याचे पुढे आले. शिवाय त्यावर पालिकेचा कर थकित असल्याने हे टॉवर पालिका कर्मचाऱ्यांनी सील केले आहे. एकूणच आर्वी नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान खोटी बतावणी करून कदम कुटुंबीयांनी टॉवर कंपनीची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. तर आता सदर टॉवर कंपनीचे प्रतिनिधी पोलीस कचेरीत पोहोचत तक्रार फसवणुकीबाबत तक्रार नोंदवितात काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कदमांचा टॉवर कंपनीसोबत करार-    अतिक्रमणित जागेवर मोबाइल टॉवर निदर्शनास येताच पालिकेच्या नगर रचनाकार विभागाने अधिकची माहिती घेतली. याच अधिकच्या माहितीदरम्यान डॉ. कुमारसिंग कदम यांनी टॉवर कंपनीसोबत करार करून काही वर्षांसाठी अतिक्रमणित जागाच भाडेतत्त्वावर दिल्याचे पुढे आले आहे.

कदम हॉस्पिटलच्या संचालकांनी नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून सुरक्षा भिंत बांधल्याने नियमानुसार ही सुरक्षा भिंत जेसीबीच्या साहाय्याने मंगळवारी पाडण्यात आली आहे. याच सुरक्षा भिंतीच्या आत अतिक्रमणित जागेवर एक मोबाइल टॉवर असून, त्यावर मोठा कर थकीत असल्याने टॉवर सील करण्यात आले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कदम यांनी मोबाइल टॉवर कंपनीची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. हे मोबाइल टाॅवर पालिकेच्या मालकीच्या जागेवर असल्याने त्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.- विजय देवळीकर,  प्रभारी मुख्याधिकारी, न. प. आर्वी 

सीओंच्या उपस्थित चालला गजराज-   कदम यांनी अतिक्रमण करून बांधलेली सुरक्षा भिंत आर्वी नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विजय देवळीकर यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली. याप्रसंगी आर्वी नगरपालिकेचे नगररचनाकार शंतनू भांडरकर, डॉ. कुमारसिंग कदम यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण