शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

बस दुरूस्तीत रिक्त पदांचा खोडा

By admin | Updated: January 6, 2015 23:04 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जिल्ह्यात ३०४ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा पुरवित आहेत़ यात मागणी करूनही नवीन बसेस मिळत नसल्याने बहुतांश बसेस वारंवार दुरूस्त कराव्या लागतात़

मेकॅनिकलची कमतरता : जिल्ह्यात १९७ पदे रिक्तप्रशांत हेलोंडे - वर्धामहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जिल्ह्यात ३०४ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा पुरवित आहेत़ यात मागणी करूनही नवीन बसेस मिळत नसल्याने बहुतांश बसेस वारंवार दुरूस्त कराव्या लागतात़ मग, यासाठी मनुष्यबळ तरी पूर्ण असावे, ही अपेक्षा असते; पण तेही नाही़ पाच आगारांच्या वर्कशॉपमध्ये यांत्रिक कामगारांची तब्बल १२२ तर मुख्य वर्कशॉपमध्येही ७५ पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांचा फटका बसेसच्या दुरूस्तीला बसत आहे़ या बसेस सुरळीत सुरू ठेवण्याचे आव्हान मात्र वर्कशॉपमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पेलावे लागत आहे़जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, आर्वी व तळेगाव असे पाच आगार आहेत़ पाचही आगारांमिळून जिल्ह्याला ३०४ बसेस लाभल्या आहेत़ यातील बहुतांश बसेस कालबाह्य झालेल्या आहेत़ यामुळेच प्रवासात असताना बसेस बंद होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे़ पाचही आगारांतील अनेक बसेस फेरी आटोपून परतली की दुरूस्तीसाठी वर्कशॉपमध्ये पाठवाव्या लागतात़ यासाठी प्रत्येक आगाराला स्वतंत्र वर्कशॉप देण्यात आले आहे़ शिवाय जिल्ह्याचे एकत्रित वर्कशॉपही सेवाग्राम एमआयडीसी परिसरात आहे़ पाच आगारांच्या वर्कशॉपमध्ये एकूण मेकॅनिकलची ३५५ पदे आहेत़ यात २३३ कर्मचारी कार्यरत असून १२२ पदे अद्यापही रिक्त आहेत़ शिवाय सेवाग्राम एमआयडीसी येथील मुख्य वर्कशॉपमध्ये १६० पदे मंजूर असताना केवळ ८५ कर्मचारी कार्यरत आहेत़ या वर्कशॉपमध्येही ७५ पदे रिक्त आहेत़ एकूण ४१५ मंजूर पदांपैकी १९७ मेकॅनिकल कमी असल्याने बसेसची दुरूस्ती करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसते़