शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके! वर्ध्यात सैनिकांसह कुटुंबियांना देणार मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 14:31 IST

देशाच्या सीमेवर २४ तास ३६५ दिवस तैनात राहून कोट्यावधी भारतीयांची सुरक्षा करणाऱ्या सैनिक तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटंबियांना खासगी दवाखान्यातही मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी वर्धेतील वैद्यकीय जनजागृती मंचाने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देवर्धेतील डॉक्टरांचा उपक्रम रजेवर आलेल्या सैनिकाला गावी पोहोचविणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाच्या सीमेवर २४ तास ३६५ दिवस तैनात राहून कोट्यावधी भारतीयांची सुरक्षा करणाऱ्या सैनिक तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटंबियांना खासगी दवाखान्यातही मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी वर्धेतील वैद्यकीय जनजागृती मंचाने पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी मुंबई हल्ल्याच्या दहाव्या स्मृतिदिनी घोषणा केली आहे. तसेच सीमेवरून रजा काळात गावी येणाऱ्या सैनिकांना रेल्वे स्थानकापासून त्यांच्या गावापर्यंत वाहनाने सोडून देण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे. याला वर्धा शहरातील वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांचे मोठे योगदान लाभले आहे.देशाच्या विविध भागात सैनिक सध्या कार्यरत आहे. देशाच्या सीमेवर तैनात राहुन देशातील लोकांची सुरक्षा करण्याचे काम सैनिकांकडून करण्यात येते. या सैनिकाप्रती आपली सामाजिक जबाबदारी म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचाने सैन्य दलात असलेल्या सैनिक, त्यांचे कुटुंबिय तसेच सैन्य दलातून निवृत्त माजी सैनिक यांना आयुष्यभर उपचार, तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासणीचीही कोणतीही फी घेतली जाणार नाही. अशी माहिती वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे सैनिक कुटंूबातील सदस्यांनी दवाखान्यात येताना आपले ओळखपत्र, तत्सम कागदपत्र सोबत बाळगावे असे आवाहन मंचाच्या वतीने करण्यात आले आहे. वैद्यकीय जनजागृती मंचाद्वारे मागील तीन वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंूबासाठी दिलासा कार्ड मोहिम राबविण्यात येत आहे. वर्धेतील १५ ते २० खासगी डॉक्टर आपल्या रुग्णालयात या दिलासा कार्डाच्या आधारे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंूबातील सदस्यांवर उपचार करीत आहे.सैन्य दलात असलेल्या सैनिक, त्यांचे गावात राहणारे कुटंूबिय, सेवा निवृत्त झालेले सैनिक यांना वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्य असलेल्या डॉक्टरांच्या खासगी रुग्णालयातून मोफत उपचार देण्याबाबत २६/११ च्या हल्ल्यातील दहाव्या स्मृतिदिनी निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय सैन्यातून रजेवर घरी जाणाऱ्या सैनिकाला स्टेशनपासून त्याच्या गावापर्यंत डॉक्टरच्या गाडीतून सोडून देण्याची व्यवस्थाही वैद्यकीय जनजागृती मंच करणार आहे. या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल.डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा

टॅग्स :Medicalवैद्यकीय