शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके! क्षणार्धात जुळल्या ऋृणानुबंधाच्या गाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:19 IST

मुलाकडील मंडळी वर्ध्यातील मुलीच्या पाहणीकरिता आले अन् विवाह करून घेऊन गेले. एकाच दिवसात दोन परिवारातील ऋणानुबंध दृढ झाल्याने हा विवाह आदर्शच ठरला आहे.

ठळक मुद्देउच्चशिक्षितांचा आदर्श विवाह पहायला आले आणि विवाह करूनच गेले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आई-वडिलांचे छत्र हरविल्यानंतर बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी भावावर येऊन पडली. मोठ्या बहिणीचा विवाह झाल्यानंतर धाकट्या बहिणीच्या विवाहाची चिंता होती. पण, अशातच मुलाचा निरोप आला आणि पाहणीची तारीखही ठरली. मुलीच्या भावाने परिवारातील वडीलधाऱ्या माणसांसह नातेवाईकांना कळविले. ठरल्या दिवशी मुलाकडील मंडळी मुलीच्या पाहणीकरिता आले अन् विवाह करून घेऊन गेले. एकाच दिवसात दोन परिवारातील ऋणानुबंध दृढ झाल्याने हा विवाह आदर्शच ठरला आहे.सर्वांच्या सहमतीने विवाह करायचा म्हटला तर वेळ आणि पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होते. इच्छित वर-वधूचा शोध घेण्यातच मोठा कालावधी लोटतो. त्यानंतरही विवाह जुळल्यानंतर इतर सोपस्कार पार पाडण्यासाठी परिवाराची मोठी कसोटी लागते. विवाह करण्यासाठीही खिसा चांगलाच रिता करावा लागतो. या साऱ्या गोष्टींचा विचार करून वर्ध्यातील शिंपी समाजातील नानोटे व अकोला येथील बानाईत परिवाराने या साऱ्या गोष्टीला फाटा देत पाहणी, साक्षगंध, हळद आणि विवाह एकाच दिवशी उरकविला. वर्ध्यातील शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष अविनाश नानोटे यांची पुतणी व स्व. संतोषराव नानोटे यांची कन्या रोशनी हिचा विवाह अकोला येथील नंदकिशोर बानाईत यांचा मुलगा आशिषसोबत झाला. रोशनी आणि आशिष हे दोघेही उच्चशिक्षित असून लग्नावर होणारा अवास्तव खर्च, त्यात जाणारा वेळ या सर्व गोष्टींचा विचार करुन दोघांनीही पहिल्याच भेटीत हा निर्णय घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

तास-दोन तासात झाल्या घडामोडीसध्याच्या युगात मुलाला योग्य मुलगी मिळत नाही तर मुलीला योग्य मुलगा मिळत नाही, अशी ओरड आहे. त्यातही मुलांना मुली मिळणे कठीण झाल्याने ‘तुम्ही फक्त मुलगी द्या, आम्ही दोन्ही बाजूचा खर्च करतो’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी मुलांकडून मुलीला हुंडा दिल्याचेही ऐकिवात आहे. अशा स्थितीत जास्त वेळ व पैसा खर्च न करता आशिषने घेतलेल्या निर्णयाला रोशनीनेही होकार दिला. दोघांचीही सहमती मिळताच लगेच लग्नाचा पुरावा म्हणून तासाभरात पत्रिका छापल्या. उपस्थित नातेवाईकांच्या साक्षीने शुभमंगलही उरकवून टाकले. तास-दोन तासातच साऱ्या घडामोडी होऊन पाहणीकरिता आलेली मंडळी सायंकाळी सहा वाजता वरात घेऊनच अकोल्याकडे निघाली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके