शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

‘जलयुक्त’ ठरले ‘उपयुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:52 IST

मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या पातळीत वाढ : सिंचनाचा लाभ, नव्या वर्षात १३८ गावांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे. यामुळेच वर्धेत जलयुक्त चांगलेच उपयुक्त ठरल्याचे बोलले जात आहे.या अभियानातून मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे नाले, नदी खोलीकरणासह आदी कामे हातात घेऊन ती प्रभावीपणे केली गेल्याने जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळीत सुमारे दीड मिटरने वाढल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याचा शेतकºयांसह नागरिकांना फायदा होत असून सिंचनाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे दिसत आहे.पाण्याची वाढती समस्या लक्षात घेवून ५ डिसेंबर २०१४ पासून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे निश्चित झाले. त्यासाठी कृषी विभाग, वन विभाग, लघु सिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आदींचा ताळमेळ जुळवत नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला. यात काही जलतज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेण्यात आले.सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून करण्यात आली. जिल्ह्यात प्रथम वर्षाला २१४ गावांची निवड करून पावसाचे पाणी ठिकठिकाणी कसे अडविता येईल व त्याचे संवर्धन कसे करता येईल यादृष्टीने एकूण ३ हजार ३०० कामे करण्यात आली. त्यावर ७२.३१ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. तर सन २०१६-१७ मध्ये २१२ गावांची निवड करून ६६.८१ कोटींचा निधी खर्च करून २ हजार २४४ कामे पूर्णत्वास आली. दोन वर्ष सतत ढाळीचे बांधबंदिस्ती, सलग समतल चर, सिमेंट नाला बांधणे, नाला खोली करण, नदी पात्रांचे खोलीकरण, गावतलावांची दुरूती तसेच खोलीकरण आदी कामे करून न थांबता यंदाच्या वर्षी १३८ गावांची निवड करीत ६७ कामे हाती घेण्यात आली. त्या कामांवर २.४ कोटींचा खर्च होणार असून बहूतांश कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहे. तर जी कामे अर्धवट स्थितीत आहेत ती पूर्णत्वास नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.९७ हजार हेक्टरला संरक्षित सिंचनजलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जिल्ह्यात ९७ हजार ५८५ हेक्टरला संरक्षित सिंचनाचा लाभ मिळाला आहे. या कामांमुळे ४८ हजार ३७५ दश हजार घनमिटर पाणी साठविण्यास मदत झाली.राज्यात दोन मॉडेल राबविणारजिल्ह्यातील दोन मॉडेल राज्य सरकारने जलसंवर्धनाच्या हेतूने उपयुक्त असल्याने ते राज्यभºयात राबविण्याचे निश्चित केले आहे. हे दोन्ही मॉडेल कसे उपयुक्त आहेत त्याबाबतची माहिती जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी राज्य सरकारला वेळोवेळी दिली आहे. सदर मॉडेलला केंद्रस्थानी ठेऊन राज्यभºयात कामे होणार असल्याने वर्धा जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा नाविण्यपूर्ण कार्याबद्दल राज्यभरात पोहोचले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार