शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

जांभुळ आरोग्यासाठी पोषकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:31 IST

पावसाळ्यात विदर्भात अनेक शहरात व गावात विक्रीसाठी येणारी जांभुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी जांभळाचे सेवन करायलाच हवे.

ठळक मुद्देपावसाळ्यात भरपूर खा : आजार पळविण्यासाठी बहुगुणी फळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यात विदर्भात अनेक शहरात व गावात विक्रीसाठी येणारी जांभुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी जांभळाचे सेवन करायलाच हवे. असा अभ्यासकांचा दावा आहे. विदर्भात विक्रीला येणारे जांभूळ हे गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातून येतात. याची अनेकांना माहिती नाही. कोरची तालुक्यातील जांभुळे दर्जेदार आहेत. नागपूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यात ते विक्रीसाठी पाठविले जातात. व नागपूरवरून वर्धा, यवतमाळ आदी भागात ते पुरवठा केले जातात.चार जातीच्या जांभळाचे होते उत्पन्नकोकण बहाडोली, गोकाक जातीच्या तीन प्रजातीत जांभळाचे उत्पन्न होते. जांभुळ औषधी गुणधर्माची असून यांचा उत्पन्न निसर्गाच्या वातावरणात जंगलात होत असल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारची रासायनिक मूलद्रव्य जात नाहीत. त्यामुळे या कोरचीच्या जांभुळाला विशेष महत्त्व आहे.जांभुळ उपचारजांभुळ फळापासून मधुमेह, अंथरून ओले करणे, रक्ती हगवण, जुलाब, दात आणि हिरड्या दुखी, जंत, घसा त्रास, मुळव्याध, ऊलटी, फुफ्फुस, मूतखडा, जखम, पांढरे जळालेले डाग, कीडा चावल्यावर आदी आजारांवर उपचार करता येतो.या आजारांवर जांभुळ रामबाण औषधजांभुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. रक्ताच्या शुद्धीकरणासाठी, पांडुरोग, कावीळ आदी विकारांवर जांभुळ उपयुक्त आहे.जांभुळाची साल पाचक व जंतुनाशक असते. या सालीचा उकाळा करून प्यायला असता अतिसार व मुरड्यावर उपयोग होतो.जांभुळामुळे पित्त कमी होते. उलटीवाटे पित्त निधून जाण्यासाठी जांभळाच्या ताज्या सालीचा रस दुधातून घ्यावा.पित्तामुळे उलटी होत असल्यास जांभळाची दोन-तीन पाने पाण्यातून उकळून व गाळून घ्यावी. मधासोबत ते प्यायल्याने पित्तशमन होते.पिकलेली जांभुळे खाल्ल्याने पित्तामुळे होणारे जुलाबही बंद होतात.हातापायांची जळजळ होत असल्यास जांभळाचा रस लावावा, त्यामुळे रक्त थांबते.जांभुळाची बी पाण्यात उगाळून घामोळ््यावर लावले असता घामोळे कमी होते.जांभुळाच्या सालीची राख मधातून दिल्याने आंबट उलट्या होण्याचे थांबते.जांभळाच्या सालीचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्या असता हिरड्यांची सूज कमी होते.

जांभुळ वृक्षाचा उपयोगजांभुळ वृक्षाचे लाकुड मजबुत आणि पाणी रोधक आहे, कृषी अवजारे, बैलगाडी चाके, घरकाम आदीकरीता लाकडाचा उपयोग होतो. पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या ठिकाणी जसे डिझेलपंपाच्या खाली, विहिरीमध्ये पाट्या वापरतात, प्रक्रियायुक्त पदार्थ- जॅम, जेली, चिप्स, वाईन, विनेगार, स्क्वॅश, लोणचे आदी, रेल्वे गाड्यांमध्ये आसने तयार करण्याकरीता, इंधन आणि कोळसा निर्मितीकरीता, पानांच्या उपयोग दंतमंजन तयार करण्याकरीता, पशुखाद्याकरीता, टसर अळ््यांचे अन्न, तेलाचा उपयोग साबण आणि अत्तर करीता, औषधी निर्मितीकरीता, कापड उद्योगामध्ये रंगकाम आणि कातण्याकरीता जांभुळ मध्य-मधमाशी पालन यात वृक्षाचा उपयोग होतो.