शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांकडून श्रावण बाळांची थट्टा

By admin | Updated: June 25, 2014 00:37 IST

संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अजय झिले यांना सौजन्याचे धडे नव्याने शिकण्याची गरज आहे. कार्यालयात माहिती विचारण्यास गेलेल्या वृद्धांशी त्यांची वागणूक असभ्यतेची आहे.

भौतिक चाचणीची आडकाठी : तुटपुंज्या रकमेवर गदाआकोली : संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अजय झिले यांना सौजन्याचे धडे नव्याने शिकण्याची गरज आहे. कार्यालयात माहिती विचारण्यास गेलेल्या वृद्धांशी त्यांची वागणूक असभ्यतेची आहे. यामुळे निराधार तहसील कार्यालयाची पायरी चढताना विचार करतात़ या प्रकरणी कारवाईची मागणी होत आहे़शासनाने वृद्ध, विधवांना मदतीचा हात म्हणून आयुष्याच्या संध्याकाळी फुल ना फुलाची पाकळी मदत रूपातून देण्याकरिता श्रावण बाळ योजना सुरू केली. हातात पडणाऱ्या अल्प रकमेने निराधारांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते; पण भौतिक चाचणीच्या नावाखाली अनेक निराधारांच्या तुटपुंज्या रकमेवर गदा आली. ज्यांना मदतीची गरज आहे, अशा शेकडो निराधारांचे अनुदान थांबविले. अनुदान बंद का केले, हे विचारण्यास कार्यालयात जाणाऱ्या श्रावण बाळांना नायब तहसीलदार समाधानकारक उत्तरे न देता परत पाठवितात. एवढेच काम आहे काय, तुम्हाला कुणी पाठविले माझ्याकडे, अशा प्रश्नांच्या सरबत्तीने वयोवृद्धांची बोबडी वळते़ तो पुन्हा कार्यालयाकडे फिरकत नाही. तहसील कार्यालयाच्या आवारात फेरफटका मारताना निराधार डोळ्यात अश्रू आणून येथे मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचा पाढा वाचतात़ दिवसभर झाडाखाली ताटकळत बसूनही न्याय पदरी पडत नसल्यामुळे हिरमुसलेले निराधार घरचा रस्ता धरतात. याबाबत झिले यांच्याशी अनेकदा संपर्क केला़ त्यांचा भ्रमणध्वनी खणखणतो; पण ‘कॉल रिसिव्ह’ करण्याची तसदी ते घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़(वार्ताहर)