शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जलस्वराज्य प्रकल्पाचे उपक्रम नाममात्र

By admin | Updated: August 27, 2014 23:47 IST

राज्य शासनाचा जलस्वराज्य प्रकल्प जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहे. सन २००८-०९ ला या प्रक्ल्पाअंतर्गत तालुक्यातील सत्तरपूर या गावात विविध उपक्रम राबविण्यात आले.

आष्टी (शहीद) : राज्य शासनाचा जलस्वराज्य प्रकल्प जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहे. सन २००८-०९ ला या प्रक्ल्पाअंतर्गत तालुक्यातील सत्तरपूर या गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून पाच शौचालयाचे युनिट उभारण्यात आले होते. या शौचालयाचे बांधकाम झाले तेव्हापासून हे युनिट कुलुपबंद आहे. यामुळे ते नागरिकांकरिता नाममात्र ठरत आहे. शौचालयाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी आहे.मागील सहा वर्षांपासून या शौचालयाचे साधे दार देखील उघडण्यात आले नाही. निकृष्ट बांधकामामुळे याची वाट लागल्याचा आरोप रामविजय टेकाम यांनी केला आहे. गावाच्या दर्शनी भागातच शौचालयाचे उभारण्यात आलेले युनिट हागणदारी मुक्त गाव योजनेचा भाग आहे. यातून गावात स्वच्छता राखण्यात मदत होईल, योजनेच्या अंमलबजावणीत ते मोलाची भूमिका पार पाडेल, असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र गावकऱ्यांच्या या अपेक्षा शेवटपर्यंत हवेतच विरल्या. सार्वजनिक शौचालयाची दार कधी उघडत नाही. तेथील पाण्याची टाकी, निकृष्ट बांधकाम आणि समोर असलेले शेणखाताचे ढिगारे आदी समस्यांचा याला विळखा आहे. गावकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने घरी शौचालय बांधून गाव निर्मल करण्यात हातभार लावला. पण हे सार्वजनिक ग्राम्स्थांच्या कधी उपयोगात आले नाही. आजही काही गरीब कुटुंबाकडे शौचालय बांधकामासाठी पैसे नाही. त्यांच्यासाठी हे युनिट महत्त्वाचा आधार ठरले असते. परंतु युनिटचे दार उघडत नसल्याने ते कायमस्वरूपी बंद आहे.जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून गावागावात पाण्याच्या टाकी, पाईपलाईन, विहिरी यासह अनेक कामे करण्यात आली आहे. शासकीय निधी खर्च झाल्यावर त्यामधून फलश्रृती मिळण्याऐवजी अनेक समस्या कामय राहत असल्याची प्रचिती येथील नागरिकांना येत आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे नसलेल्या नियोजनाचा फटका याला कारणीभूत ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. लाखो रूपये खर्च झाल्यावर त्याचा वापर होत नसेल तर काय कामाचा काय उपयोग असा प्रश्न टेकाम यांनी ग्रामस्थांच्यावतीने उपस्थित केला आहे. शासनाने जलस्वराज्य प्रकल्प कायमस्वरूपी गुंडाळला आहे. त्यामुळे योजना राबविणारी दोषी यंत्रणा बिनधास्त आहे. त्यांच्यावरती वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याचा आरोप होत आहे. सदर शौचालयाचा वापर होत नसल्याने ते पाडून टाकण्याची मागणी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. या गावाला स्वतंत्र ग्रा.पं. नाही वडाळा अंतर्गत ही गटग्रामपंचायत आहे. यामुळे येथील सुविंधाकडे दुर्लक्ष केले जाते.(प्रतिनिधी)