शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘दी बर्निंग’ ट्रकचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:47 IST

बोथली येथून कोंढाळी येथील शासकीय गोदामात तेंदू पत्ता घेऊन जाणाऱ्या ट्रकने टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ पेट घेतला. यात तेंदू पत्त्यासह ट्रक खाक झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देटाकळी जवळील घटना : तेंदूपत्ता घेऊन कोंढाळीला जात होता ट्रक

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/झडशी : बोथली येथून कोंढाळी येथील शासकीय गोदामात तेंदू पत्ता घेऊन जाणाऱ्या ट्रकने टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ पेट घेतला. यात तेंदू पत्त्यासह ट्रक खाक झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. लोंबकळणाºया वीज तारांचा स्पर्श झाल्याने तेंदू पत्त्याने पेट घेतल्याचे सांगण्यात आले.बोथली येथे तेंदू पत्ता गोळा करून वाविण्यास ठेवला होता. तो तेंदु पत्ता एमएच ३१ एपी ६८४५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरून कोंढाळी येथील शासकीय गोदामात नेला जात होता. ट्रक बोथलीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिरापर्यंत पोहोचला असता ऐन गावालगत रस्त्यावर लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा तेंदु पत्त्याला स्पर्श झाला. यामुळे प्रथम तेंदू पत्त्याने पेट घेतला व आगीने क्षणार्धात ट्रकला आपल्या कवेत घेतले. ही बाब वाहन चालक मालक अरविंद विट्ठल सोनेकर (५४) रा. जुनोना (फुके) ता. नरखेड यांच्या लक्षात येताच त्यांनी खाली उतरून आग विझविण्यासाठी धडपड केली. यात त्यांना आस लागली.गावातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सावरकर यांच्या शेतातून पाईप टाकून कृषी पंपाद्वारे ट्रकला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, वर्धा न.प. च्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले; पण ग्रामस्थांनी आग विझविल्यानंतर अग्निशमन दल टाकळी गावात दाखल झाले.माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वीज तारांमुळे आग लागल्याने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली; पण वीज कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले नाही.दहा वर्षांतील दुसरी घटनारस्त्यावर लोंबकळणाऱ्या विद्युत तारांना स्पर्श होऊन आग लागण्याची दहा वर्षांतील दुसरी घटना असून वीज कंपनी दुरूस्ती करीत नाही. ही घटना गांभीर्याने घेत दुरूस्ती गरजेची झाली आहे.

टॅग्स :fireआग