शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
2
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
3
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
4
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
5
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
6
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा
7
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
8
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
9
भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार; RBI गव्हर्नर मल्होत्रांचा मोठा दावा, कुणाला दिलं श्रेय?
10
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
11
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
12
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
13
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
14
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
15
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
16
वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग!
17
जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!
18
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
19
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
20
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास

जनसंघ, जनता पार्टी ते भाजप वाटचालीत पहिले यश आर्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

भाजपचा प्रवास वर्धा जिल्ह्यात जनसंघापासून सुरू झाला. या प्रवासात यशाची पहिली कमान दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघात उभारली. त्यापूर्वी सर्व निवडणुका जनसंघ, जनता पार्टी व भाजपने प्रातिनिधिक स्वरूपातच लढल्यात, असे वर्धा जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकींचे सिंहावलोकन केल्यावर दिसून येते.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये दोन जागांवर मिळविला भाजपने विजय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आज ज्या भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ लागली आहे, त्या भाजपचा प्रवास वर्धा जिल्ह्यात जनसंघापासून सुरू झाला. या प्रवासात यशाची पहिली कमान दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघात उभारली. त्यापूर्वी सर्व निवडणुका जनसंघ, जनता पार्टी व भाजपने प्रातिनिधिक स्वरूपातच लढल्यात, असे वर्धा जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकींचे सिंहावलोकन केल्यावर दिसून येते.१९६२ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत जनसंघाचे उमेदवार म्हणून हिंगणघाटमधून यशवंत वसंत सरोदे रिंगणात होते. त्यांना १,६६६ मते मिळाली. याच निवडणुकीत वर्ध्यावरून विठ्ठल तुकाराम मेश्राम, पुलगाववरून गणपत सदाशिव चांदेकर यांनी निवडणूक लढविली. मेश्राम यांना ३,६७१, चांदेकर यांना ५,३४१ मते मिळाली. त्यानंतर भारतीय जनसंघाकडून १,९६७ ला वर्ध्यातून आर.डी.सावल निवडणूक लढलेत. सावल यांना ३,९७३ मते मिळाली. त्यानंतर १९७२ मध्ये पुलगाव मतदारसंघातून भारतीय जनसंघाकडून रामराव बापूजी पोहेकर यांनी निवडणूक लढविली. पोहेकरांना १,२७३ मते मिळाली होती. त्याचवर्षी हिंगणघाट मतदार संघातून विठ्ठल कोसुरकर भारतीय जनसंघाकडून मैदानात होते. कोसुरकरांना २,६०५ मते मिळाली. १९७८ ला जनता पक्षाकडून आर्वी मतदारसंघातून धैर्यशील विनायक राव वाघ यांनी निवडणूक लढविली. वाघ यांना निर्णायक ११ हजार ८९० मते मिळाली. त्यांनतर एकदम १९९० मध्ये पुलगाव मतदारसंघातून विजयकुमार निवल तर वर्धा मतदारसंघातून पुरुषोत्तम इंगळे निवडणूक लढलेत. निवल यांना ५,१९७ तर इंगळे यांना ३,४४१ मते मिळाली. त्यानंतर १९९५ ला आर्वी मतदारसंघातून भाजपकडून दादाराव यादवराव केचे यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना ४६९४ मते मिळाली. तर पुलगाव मतदारसंघातून पुरुषोत्तम फुलकरी निवडणूक लढले. फुलकरींना १२,४१९ मते मिळाली. १९९९ मध्ये पुलगाव मतदारसंघातून चरणसिंग चावरे, आर्वीतून विजयराव मुडे या दोघांनी भाजपकडून निवडणूक लढविली. यात चावरे यांना १५,४५९ तर विजय मुडे यांना ३१,२५४ मते मिळाली. त्यानंतर २००४ मध्ये आर्वीतून दादाराव केचे निवडणूक लढलेत. त्यांना ४५ हजार ८६१ मते मिळाली. त्यानंतर २००९ मध्ये आर्वीतून पुन्हा दादाराव केचे निवडणूक लढले. त्यांना ७१ हजार ६९४ तर पुलगावमधून रामदास तडस यांना ५४ हजार ८२० मते मिळाली. या संपूर्ण जनसंघ, जनता पार्टी ते भाजप या प्रवासात २००९ मध्ये दादाराव केचे विजयी झालेत. हाच भाजपचा वर्धा जिल्ह्याच्या इतिहासातील पहिला विजय होता. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत वर्धा व हिंगणघाट या दोन मतदारसंघात भाजपने आपले आमदार निवडून आणले आणि जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला राजकीयदृष्ट्या ‘अच्छे दिन’ आले.

टॅग्स :Electionनिवडणूक