शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

स्वातंत्र्य चळवळीमध्ये जंगल सत्याग्रहाची मोलाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:10 IST

इतिहासात तळेगावची नोंद भोसलेकालीन शामजीपंत महाराजाचे मंदिर, बाहुली व सत्याग्रही घाट अशी आहे. हा इतिहास ८७ वर्षापासून काळाच्या पडद्याआड दडलेला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये तळेगावची भूमिका महत्वाची होती, असे प्रतिपादन आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी केले.

ठळक मुद्देरामदास आंबटकर : तळेगावच्या दत्त गडावर स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : इतिहासात तळेगावची नोंद भोसलेकालीन शामजीपंत महाराजाचे मंदिर, बाहुली व सत्याग्रही घाट अशी आहे. हा इतिहास ८७ वर्षापासून काळाच्या पडद्याआड दडलेला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये तळेगावची भूमिका महत्वाची होती, असे प्रतिपादन आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी केले.सत्याग्रही घाटातील गारगोटीच्या माथ्यावर आमदार डॉ. आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन १९३० जंगल सत्याग्रहामध्ये सहभागी असलेल्या ३० हजार स्वातंत्र्य सेनानींना शेकडो नागरीकासह आदरांजली वाहली यावेळी ते बोलत होते. ग्रामपंचायत तळेगावच्यावतीने तिरंगा एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात राष्ट्रसंत चौकातून करण्यात आली. त्यात शेकडो नागरिकांनी सहभागी झाले. सन १९३० च्या जंगल सत्याग्रह दत्तगड ध्वजारोहण भूमीत माजी सैनिक विजय इंगळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सन १९३० च्या जंगल सत्याग्रहाची भूमिका मोलाची होती. विदर्भातील लोकांनी जंगल सत्याग्रहाच्या माध्यमातून एक नैतिक विजय प्राप्त केला.१ आॅगस्ट १९३० रोजी तळेगाव येथील दतगडावर ३० हजार स्वयंसेवक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपतराव टिकेकर व श्रीधरराव दाते यांच्या नेतृत्वात तळेगाव पंचक्रोशीतील शेतकरी शेतमजूर गोळा झाली. तेथून चार-चारचे शेकडो गट तयार करून गारगोटीच्या माथ्यावर एका मागवून एक शिस्तबध्द शांतमय असे जात होते. स्वयंसेवकाच्या नेत्रदीपक कार्यामुळे इंग्रजांचे सनदी नोकर भारावून गेले, असे आ. आंबटकर म्हणाले. रॅलीचा समारोप माजी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थित झाला. यावेळी अधिकारी वन परिक्षेत्र तळेगावचे पाटील,जि.प. सदस्य अंकिता होले, हेमलता भगत, वाहिद पठाण, मनिषा गाडगे, सुनील मोहेकर, नंदू जाधव, प्रशांत कडू, अंकुश नरंगे, राहुल गाडापेले, प्रफुल डहाके, ग्रा.प. सदस्य, सत्याग्रह शेतकरी संघ सदस्य मुकुंद ठाकरे, सचिन होले, नवाज पठाण, दतात्रय पुसदेकर, त्रिशूल भुयार, राहुल बुले, प्रकाश राऊत, सोनिसिंग टाक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस