शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हत्येतील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:35 IST

पतीसोबत वाद घालत जिवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. त्यानंतर बेशुध्द अवस्थेत घरी आणून सोडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी तक्रार मृतक राजू देवराव कुंभरे रा. ममदापूर यांची पत्नी मंदा कुंभरे यांनी आज पोलिसात केली.

ठळक मुद्देकुंभरे हत्या प्रकरण : दोन दिवस पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पतीसोबत वाद घालत जिवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. त्यानंतर बेशुध्द अवस्थेत घरी आणून सोडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी तक्रार मृतक राजू देवराव कुंभरे रा. ममदापूर यांची पत्नी मंदा कुंभरे यांनी आज पोलिसात केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी हरिदास भाऊराव कुंभारे याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता १४ सप्टेंबरपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.मृतक राजू कुभरे (४०) रा.ममदापूर यांच्यासोबत आरोपी हरिदास कुंभरे याने १ आॅगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता वाद केला. जीवानिशी ठार करण्याच्या उद्देशाने गोठ्यातील दांडक्याने जबर मारहाण केली.यात राजुच्या डोक्याला गंभीर मार लागला. पुरावा नष्ट करण्यासाठी सांडलेले रक्त पाण्याचे धुवून टाकले आणि जखमी अवस्थेत राजुला घरी आणून सोडले.त्यानंतर लगेच राजुला त्यांच्या घरच्यांनी अमरावतीच्या रुग्णालयात दाखल केले. येथेच २ आॅगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत राजुंची पत्नी मंदा यांनी गुरुवारला पोलिसात तक्रार नोंदविली.पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी हरिदास भाऊराव कुंभरेला अटक केली. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रवी राठोड, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपकुमार राठोड, पोलीस कर्मचारी निलेश पेटकर, सचिन साठे, हकिम शेख हे करीत आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस