शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

‘जय श्रीराम’च्या गजरात शो भा या त्रा

By admin | Updated: April 16, 2016 01:31 IST

प्रभू श्रीराम जन्मोत्सवाची धूम जिल्ह्यात पाहायला मिळाली. गुरूवारी सकाळपाूसन श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती.

वर्धा शहरात रामनामाचा जयघोष : मिरवणुकीतील देखाव्यातून साकारली रामकथावर्धा : प्रभू श्रीराम जन्मोत्सवाची धूम जिल्ह्यात पाहायला मिळाली. गुरूवारी सकाळपाूसन श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. प्रभू रामाच्या दर्शनाकरिता मंदिरांमध्ये रांगा लागल्या होत्या. यानंतर दुपारी व सायंकाळी निघालेल्या प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रेने वातावरण मंगलमय झाले. रामजन्मानिमित्त रामकथा प्रवचन, शोभायात्रा, झांकी, रक्तदान शिबिर यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रीरामाच्या जयघोषाने जिल्हा भक्तीरसात न्हाऊन निघाला.गोल बाजार येथील श्रीराम मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली होती. मंदिर परिसरात भाविकांना पुरण व सरबताचे दिवसभर वितरण करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता पालखी पूजन करण्यात आले. यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. श्रीराम मंदिरातून निघालेली शोभायात्रा बालाजी मंदिर, कपडा लाईन, पत्रावळी चौक, अंबिका चौक, पानाचंद चौक, शनिमंदिर, हनुमान मंदिर सोशालिस्ट चौक, इंदिरा मार्केट, देवी अष्टभूजा चौक, वीर सावरकर चौक, दत्त मंदिर येथून परत श्रीराम मंदिरात पोहोचली. मथुरा येथे होणारी ‘राधा-कृष्ण फुलांची होळी’ व १०० युवक-युवतींचे ‘रूद्रनाद’ ढोल-ताशा पथक मुख्य आकर्षण ठरले. राज्यातील संत व महापुरूषांच्या झांक्या, प्रभू श्रीरामाचे सजीव दृश्य, श्रीराम, सिता, लक्ष्मण व हनुमानाच्या वेशभूषेतील चिमुकले भाविकांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेत सहभागी दिंड्या व भजनी मंडळांनी श्रीरामाचा जयघोष केला. रामनवमीनिमित्त शहरात दूर्गा पूजा उत्सव मंडळ, व्यापारी असो., सामाजिक संघटनांद्वारे स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. भगव्या पताकांनी शहर भगवे झाले होते. बजाज चौकात सकाळपासून भजने सुरू होती. शहरात ठिकठिकाणी अल्पोपहाराचे स्टॉल लावण्यात आले.जय पवनसुत हनुमान मंदिर पवनसुतनगर देवस्थान ट्रस्टद्वारेही पालखी मिरवणूक काढण्यात आली. श्रीराम शिवमंदिर गांधीनगरद्वारे सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. यात सहभागी बॅन्डपथक, घोडागाडी, दिंडी व भजनी मंडळ लक्ष वेधून घेत होते. ही शोभायात्रा श्रीराम शिव मंदिर, आर्वी नाका, बॅचलर रोड, जुना आरटीओ चौक, शिवाजी चौक, केळकरवाडी येथून मार्गक्रमण करीत मंदिरात पोहोचली. वरुण पाठक व मित्र परिवाराने शोभायात्रा काढली. राममंदिरात समारोप करण्यात आला.श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती अयोध्या धाम शास्त्री चौकद्वारे सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. बजाज चौक, इतवारा चौक, पटेल चौक, अंबिका चौक, निर्मल बेकरी चौक, सोशालिस्ट चौक, इंदिरा मार्केट येथून मार्गक्रमण करीत शोभायात्रा परत मंदिरात पोहोचली. पितळेच्या मूर्त्यांची झांकी मुख्य आकर्षण ठरली.