शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:11 IST

तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द इतरांना न दुखावणारे असावेत.

ठळक मुद्देके. पी. निंबाळकर म्हणाले,

तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द इतरांना न दुखावणारे असावेत. म्हणजे खऱ्या अर्थाने स्नेह, आपुलकीचे, प्रेमाचे नाते जोडले जाऊ शकते, हे सहज शक्य आणि बिनखर्चाचे आहे. दुसऱ्यांशी रागाने बोलणारी माणसे अनेक आहेत. राग अनावर झाला असताना व्यक्ती आपली भावना व्यक्त करीत असते, तेव्हा ती बाह्य लक्षणांवरून सुंदर न दिसता विकृत दिसते. राग ही नकारार्थी भावना असून त्याचे शरीरावर नकारार्थीच परिणाम होतात. म्हणून स्वत:च्या भावनांचे संयमन साधत नकारार्थी भावनांना दूर ठेवून सकारात्मक जीवन जगणे शक्य आणि सोपे आहे. त्याकरिता अभिवृत्तीमध्ये बदल करणे महत्त्वाचे ठरते. मन ही अमूर्त संकल्पना असल्याने व मनाला स्वत:चे शरीर नसल्याने रागामुळे जो ताणतणाव निर्माण होतो, त्याचे पडसाद शरीरावर उमटत असतात आणि त्यातूनच विविध प्रकारचे मनोशारीरिक आजार उद्भवतात असेही डॉ. निंबाळकर म्हणाले.आपल्याच मुखातून बाहेर पडणारे शब्द हे केवळ शब्द असले तरी ते इतरांसाठी असतात. शब्द माणसांना जोडतात अन् कायमचे दूरही सारतात. म्हणून शब्द तोलून, मापून बोलणे बरेचदा गरजेचे असते. बऱ्याच गोष्टी मनाला पटत नसल्या तरी वागण्या-बोलण्याशी सुसमायोजन साधून गोड बोलण्यात गैर काय? जग, समाज सुंदर आहे. आपण स्वास्थ्य जपले पाहिजे.