शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Wardha Blast; ... तर मोठा अनर्थ घडला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:55 IST

पेटीतील अनेक बॉम्ब एकाचवेळेस फुटल्याने यातील एक बॉम्ब जवळच उभ्या असलेल्या मिलीटरी व्हॅनच्या टायरला छेदून गेला. हा बॉम्ब व्हॅनमधील दारूगोळ्यात पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

ठळक मुद्देएका पेटीत होते अनेक बॉम्ब

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मंगळवारी सकाळी जबलपूर दारूगोळा भांडारातील जिवंत बॉम्ब येथील आरक्षित जागेत निकामी करण्याची प्रक्रिया पार पाडली जात होती. घटनास्थळावर शेकडो बॉम्ब असलेल्या व्हॅनमधून पेट्या खाली उतरविल्या जात होत्या. त्या पेट्या एक-एक करून जमिनीतील खोल खंदकांपर्यंत पोहचवित असताना एक पेटी मृतक नारायण पचारे यांच्या डोक्यावरून खाली पडल्याने ही घटना घडली.पेटीतील अनेक बॉम्ब एकाचवेळेस फुटल्याने यातील एक बॉम्ब जवळच उभ्या असलेल्या मिलीटरी व्हॅनच्या टायरला छेदून गेला. हा बॉम्ब व्हॅनमधील दारूगोळ्यात पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.या घटनेत जबलपूर येथील दारू भांडारातील अधिकारी उदय वीरसिंग (२७) यांच्यासह सोनेगाव आबाजी येथील विलास लक्ष्मण पचारे (४०) व नारायण श्यामराव पचारे (५५), प्रवीण प्रकाश मुंजेवार (२५) रा.केळापूर हे चार जण जागीच ठार झाले. तसेच प्रभाकर रामदास वानखेडे (४०) रा. सोनेगाव (आबाजी) व राजकुमार राहुल भोवते (२३) रा. केळापूर हे दोघे जण सावंगी रूग्णालयात नेत असताना वाटेवर मरण पावले. या व्यतिरिक्त घटनेतील ११ जण जखमी असून यामध्ये विकास शेषराव बेलसरे, संदीप शंकर पचारे, रूपराव सीताराम नैताम, हनुमान सराटे, रा. सर्व सोनेगाव (आबाजी), दिलीप निमगाडे, मनोज मोरे, प्रशांत मुंजेवार, रा. सर्व रा. केळापूर, मनोज सयाम, प्रविण सिडाम, प्रशांत मडावी, ईस्माईल मो. शहा रा. सर्व जामनी (चिकणी) यांचा समावेश आहे. यातील प्रवीण सिडाम, प्रशांत मुंजेवार, दिलीप निमगाडे व मनोज मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहे. हे सर्व पुलगाव येथील अनधिकृत कंत्राटदार शंकर चांडक व अशोक चांडक यांच्याकडे रोजमजूरीने काम करीत होते, अशी माहिती पुढे आली आहे. घटनेनंतर चांडक बंधूवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी जोरदार आक्रोश केला.घटनास्थळी ठार झालेल्या दोन मृतकांवर घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉ. इंद्रजीत खांडेकर, डॉ. प्रवीण झोपाटे, डॉ. राजेश कुडे या फॉरेन्सीक तज्ज्ञांनी शवविच्छेदन केले. दोन मृतदेह सावंगी येथील रुग्णालयात होते. त्यांच्यावर सुद्धा शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी व पंचनामा करण्यात आला. घटनास्थळाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे, तहसीलदार बोंबर्डे, देवळीचे ठाणेदार दिलीप ठाकूर व पुलगाव दारूगोळा भांडारातील अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. यातील जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. रुग्णालयात जावून माजी खासदार दत्ता मेघे, चारूलता टोकस, शोभा तडस आदींनी भेट देवून जखमींची विचारपूस केली.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोट