शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांची ‘ती’ सेवाग्राम भेट अविस्मरणीय ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:59 IST

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही शिकवण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजबांधवांना दिली. याच महामानवाची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट १ मे १९३६ ला सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत झाली होती.

ठळक मुद्देदिन विशेष : जुन्या वस्तीत ‘त्या’ स्मृती अजूनही कायमच

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही शिकवण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजबांधवांना दिली. याच महामानवाची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट १ मे १९३६ ला सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत झाली होती. हा योग अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडविणाराच होता, अशी माहिती त्या घटनेचे साक्षदार नामदेव गोसावी यांनी दिली.सेवाग्राम येथे १ मे १९३६ मध्ये महात्मा गांधीजीना भेटण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यावेळी सदर दोन्ही महापुरूषांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली होती. आश्रमची सायंकाळची प्रार्थना झाल्यानंतर ते जुन्या वस्तीत समाजबांधवांना भेटावयास आले. मोकळ्या मैदानात एका दगडावर बसून त्यांनी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्त्वावर समाजाची उभारणी करण्याचे ध्येय व उद्दिष्ट समोर ठेवले होते. यात शिक्षण व चारित्र्य यावर त्यांचा विशेष भर होता. समाजबांधवांना त्यांनी आपल्या मुला-बाळांना शिक्षण द्या, संस्कार देऊन चारित्र्यवान बनवा, राहणीमान सुधारा आणि व्यसन करू नका, असा मोलाचा सल्ला दिला होता, असे नामदेव गोसावी यांनी सांगितले. त्यावेळी मी लहान होतो.डॉ. आंबेडकरांचे शेवटचे भाषण मी नागपूरच्या दीक्षाभूमीवर ऐकले. त्यांची अनेक वाक्ये मला अजूनही आठवतात. मी घरावर तुळशीपत्र ठेवले; पण तुम्ही कुटुंब सांभाळा आणि घडवा, असे आवाहन त्यांनी केले होते.सेवाग्राम येथील जुन्या वस्तीतील अ.भा.बौद्ध महासभा समितीअंतर्गत परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ आजही आहे. डॉ. आंबेडकर ज्या दगडावर बसले होते, त्या परिसराला सुशोभित करण्यात आले आहे. शिवाय, सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत याच परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गांधीजींशी भेटण्यासाठी सेवाग्राम येथे आले होते. त्यांच्यात विविध विषयावर त्यावेळी चर्चा झाली. सायंकाळी गावातील नागरिकांशी ते भेटले. आश्रमाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.- टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष, गांधी आश्रम, सेवाग्राम.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम