शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

शिकण्याची इच्छा असली तरच अंगीभूत कौशल्यांचा विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:57 IST

देशात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नोकऱ्या कमी पडत आहे. त्यामुळे उच्च शिक्षित तरुणही नोकरीच्या शोधात भटकताना दिसतता.

ठळक मुद्देशितल गाते : प्रधानमंत्री मुद्रा योजनेत प्रसार मेळावा

ऑनलाईन लोकमतपुलगाव : देशात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नोकऱ्या कमी पडत आहे. त्यामुळे उच्च शिक्षित तरुणही नोकरीच्या शोधात भटकताना दिसतता. आजच्या युवा पिढीने नोकरीच्या मागे न धावता दुसºयांना नोकरी देण्यासाठी स्वत: उद्योजक बना. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना त्यापैकी एक. इच्छा असली तरच तरुणांना अंगीभूत कौशल्य विकसीत करता येईल, असे मत नगराध्यक्ष शितल गाते यांनी व्यक्त केलेल्.हरदयाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रचार व प्रसार मेळाव्याचे उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण निरीक्षक विशाल रांगणे, कौशल्य विकास व उद्योजकता सहायक संचालक डी.एम. गोस्वामी, जिल्हा अग्रणी बॅँकेचे प्रबंधक वामन कोहाड, प्राचार्य देवानंद गायधनी, प्रशिक्षण अधिकारी महाजन, प्राचार्य संदीप बोरकर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बोरकर यांनी केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य कुंभार महासंघाचे अध्यक्ष संजय गाते यांनी मुद्रा योजनेचा बेरोजगारांना लाभ देताना बॅँकेकडून निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत माहिती दिली. प्रबंधक कोहाड यांनी सेवा, व्यापार व निर्मिती या तीन क्षेत्रासाठी मुद्रा ऋण देते. शिशु, किशोर व तरुण असे तीन भाग असून योजनेतून ५० हजार ते १० लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. या मेळाव्यात डॉ. युगल रायल, सी.ए. दिपक कुंभारे, राकेश कदम, सुरेश गजराज, शिवाजी चौधरी, बॅँकचे प्रतिनिधी उमेश ठाकुर यांनी मार्गदर्शन केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेवून यशस्वी उद्योजक ठरलेले प्रविण ठवळी, सुरज तीखे, वैभव टाले यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव केला. संचालन श्रीकांत बुलकुंडे यांनी केले. मेळाव्याला बबन टाले तसेच सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.मुद्रा योजना प्रचार व प्रसार मेळावाआष्टी (शहीद) - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने मुद्रा योजना प्रचार व प्रसार मेळावा घेण्यात आला. औद्योगिकीकरणाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना औद्योगिक विकासात सामावून घेण्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळणारे आर्थिक पाठबळ, त्या अनुषंगाने शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. तालुक्यातील व्यावसायीक शिक्षण देणाऱ्या संस्था, हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, तांत्रिक शिक्षण घेतलेले व व्यवसायामध्ये स्थिरस्थावर झालेले संस्थेतील आजी व माजी विद्यार्थ्यांनी नावांची नोंद केली. यशस्वी उद्योजक व व्यावसायिकांचा कार्यक्रमस्थळी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला अध्यक्ष भरत वणझारा, उद्घाटक वामन कोहाड, विशेष पाहुणे आर.के. सूर्यवंशी, आर.आर. मिश्रा, निलेश कदम, युगुल रायलु, अरविंद गिरी, दिरुडकर, शारदा ढोले, कुंभारे या सर्व मान्यवरांनी मुद्रा योजनेची व्याप्ती व शासनाच्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ३५० विद्यार्थ्यांनी पुर्ण वेळ उपस्थिती दर्शविली. मुद्रा योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक, औद्योगिक संस्थेचे प्राचार्य जोशी यांनी केले. संचालन प्रा. गुणवंत मानमोडे व आभार प्रदर्शन मुसळे यांनी केले.