शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलातून काढावी लागते वाट

By admin | Updated: August 7, 2016 00:31 IST

प्रतापनगर परिसरालगतच्या न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनीतील रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे.

न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनीतील प्रकार : मार्ग काढताना वाहन धारकांना करावी लागते तारेवरची कसरत वर्धा : प्रतापनगर परिसरालगतच्या न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनीतील रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने आवागमन करताना चांगलीच दमछाक होत आहे. या मार्गाने वाहने तर सोडा पायदळ चालणेही कठीण झाले आहे. नगर पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तुकडोजी शाळेच्या मैदानाकडून आयटीआय टेकडीकडे जाणाऱ्या मार्गावर न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनी वसलेली आहे. या वसाहतीतील एकमेव मुख्य रस्त्याने दररोज शाळकरी मुले, नागरिक तसेच आयटीआय टेकडीवर सकाळी, सायंकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गर्दी असते. पालिकेने लक्ष दिले नसल्याने रस्त्याची पुरती चाळणी झाली आहे. रस्त्यावर खोल खड्डे पडले असून पावसाचे पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचून डबके तयार झाले आहे. यातून वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रात्रीच्या सुमारास काही वाहन धारक वाहनासह रस्त्यावरच पडले. पायदळ चालण्यायोग्यही रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही कानाडोळा केला जात आहे. परिणामी, अपघाताची शक्यता बळावली आहे. पालिका प्रशासनही मोठ्या अपघाताची ती प्रतीक्षा करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगर परिषद प्रशासनाने न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनी परिसरातील रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी) नाली बांधकामाने पडली अडचणीत भर न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनी परिसरातील रस्त्याची आधीच वाट लागली असल्याने येथून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कधी तोल जाऊन खड्ड्यांत पडावे लागेल याचा नेम राहिला नाही. खड्डे इतके खोल आहे की पावसाच्या पाण्याने त्याचा अंदाज घेता येत नाही. अशा परिस्थितीतही त्या रस्त्याच्या एका बाजूने नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी लागणारे रेती, गिट्टी आदी साहित्य हे रस्त्यावरच टाकण्यात आले आहे. यामुळे आधीच चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत होती. यात बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्याने शिल्लक राहिलेला चांगला रस्ता अरूंद झाला आहे. आता वाहनधारकांना हाती वाहन धरूनच मार्ग काढावा लागणार आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. समस्या बोकाळल्या, नगरसेवकांचे दुर्लक्ष या परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याही नगर परिषदेचे कर्मचारी नियमित साफ करीत नाही. नगरसेवक आले की, तेवढ्यासाठी देखावा केला जातो. नगरसेवकांनी पाठ फिरविली की, कर्मचारीही निघून जातात. परिणामी, आजही नाल्या तुंबलेल्या आहे. नाल्याही भरल्या. रस्त्यावरील खड्डेही जलयुक्त झाल्याने डासांच्या उत्पत्तीला चांगलाच वाव आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यामुळे नगरसेवकांनी लक्ष देत नागरिकांची समस्यांतून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.