धर्मदाय आयुक्तांचा आदेश : अध्यक्षपदी खटेश्वर खोडके यांची नियुक्तीवर्धा : संत लोटांगण महाराज उपासक मंडळातील कार्यकारिणीचा वाद सहायक धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने मिटला आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी खटेश्वर खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामदास पवार यांनी धर्मदायक आयुक्तांकडे कार्यकारिणीबाबत बदल अर्ज दाखल केला होता; पण तो फेटाळण्यात आला. यामुळे संत लोटांगण उपासक मंडळाचे अध्यक्ष कोण, हा प्रश्न निर्माण झाला होता. खटेश्वर खोडके यांनी ११ विश्वस्थांना मान्यता मिळावी, यासाठी ७ आॅगस्ट २०१५ ला सहायक धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. याबाबतचा निकाल जाहीर झाला आहे. आयुक्तांच्या निर्णयानंतर संस्थेच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी सरपंच मारोती लोहवे, पोलीस पाटील अरविंद कांबळे उपस्थित होते. नवनियुक्त अध्यक्ष खटेश्वर खोडके यांचा उपस्थितांनी सत्कार केला. बैठकीत संस्थेचे सचिव मनोज बोदडे यांनी विचार व्यक्त केले. धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानुसार मंडळाचा संपूर्ण व्यवहार आता नव्या कार्यकारिणीच्या ताब्यात आला आहे. सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यासाठी पूढील दिशा ठरविण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)
लोटांगण उपासक मंडळाचा वाद मिटला
By admin | Updated: May 30, 2016 01:52 IST