शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वेतनातील अनियमिततेने डाटा आॅपरेटर त्रस्त

By admin | Updated: October 11, 2014 23:11 IST

महाआॅनलाईन अंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री आॅपरेटर वेतनातील अनियमिततेने त्रस्त आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आॅपरेटरला वेतन दिले जात नाही. परिपत्रकात नमूद आणि प्रत्यक्षात दिले

वर्धा : महाआॅनलाईन अंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री आॅपरेटर वेतनातील अनियमिततेने त्रस्त आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आॅपरेटरला वेतन दिले जात नाही. परिपत्रकात नमूद आणि प्रत्यक्षात दिले जाणारे वेतन यात तफावत असून प्रत्येक महिन्याला वेतन अनियमित होत असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. काही सक्तीचे नियम बनविल्याने ते जाचक ठरत आहेत. वर्धा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत आॅपरेटर यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.महिन्याकाठी मिळणारे वेतन आणि परिपत्रकात नमूद वेतन राशी यातील तफावत दूर न केल्यास ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. डाटा एन्ट्री आॅपरेटर युनियनच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनाची प्रत जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आहे. या निवेदनानुसार, शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकात जि.प.स्तरावर एक संगणक प्रोग्रामर, चार संगणक आॅपरेटर तसेच पं.स. स्तरावर एक संगणक प्रोग्रामर आणि दोन आॅपरेटर अशी पदे आहेत. एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत येथे एक डाटा एन्ट्री आॅपरेटरची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहे. या सर्व पदांना मानधन निश्चित केले आहे. परंतु ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणाऱ्या डाटा एन्ट्री आॅपरेटरला निर्धारित आठ हजार रुपये मानधन दिले जात माही. शिवाय अन्यत्र कार्यरत आॅपरेटरला कमी वेतन दिले जाते. यातही अनियमितता असल्याने आॅपरेटर त्रस्त झाले आहे.शासनाने कोणतेही नवीन परिपत्रक काढले नसताना आॅपरेटरवर जाचक नियम लादण्यात आले आहे. महिन्याला ठरावीक डाटा एन्ट्री न केल्यास वेतन दिले जाणार नाही, अशी जाचक अट आहे. तालुका व जिल्हा समन्वयक यांच्याकडून आॅपरेटरवर सक्ती केली आहे. यामुळे आॅपरेटरला यापुढे वेतन मिळणार का, अशी धास्ती वाटते. डाटा एन्ट्री आॅपरेटकडून दोन-दोन महिने मानधन न देता कामे करुन घेतली जातात. नव्याने नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर यांचे मानधन गत पाच दिलेले नाही. हजेरी नियमित असताना वेतनात अनियमितता बाळगली जाते. मात्र अदा केल्या जात नाही. शासनाने सर्वांना मानधन ठरवून दिले असताना अशी तफावत का केली जाते, आदी प्रश्न निवेदनातून उपस्थित केला. वेतनातील तफावत, अनियमितता यावरुन हिंगणघाट येथील आॅपरेटरने शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन देताना या मागण्यांवर तोडगा न काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. शिष्टमंडळात विवेक दुधकोहळे, तुषार राऊत, निलेश वैरागडे, बिट्टू रावेकर, निखिल कहाथे, विपुल शिंदे, संजय काळे, मिथुन धमाने यासह आदींची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)