वर्धा न.प.तील कंत्राट प्रकरण : विरोधकांनाही धक्कावर्धा : येथील प्रभाग क्र. ९ चे नगरसेवक शेख इकबाल शेख चाँद यांच्यावर स्वत: कंत्राट घेतल्याचा ठपका ठेपत पालिकेने ५ एप्रिल २०१४ रोजी येथील न्यायायालयात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणात त्यांचे पालिकेचे सदस्यत्वही रद्द झाले होते. या प्रकरणाचा निकाल प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांच्या न्यायालयाने इकबाल शेख यांच्या बाजुने दिल्याने पालिकेसह त्यांच्या विरोधकांना मोठी चपराक बसली आहे.नगरसेवक असताना स्वत: कंत्राट घेतल्याचा ठपका पालिकेने इकबाल शेख यांच्यावर ठेवत न्यायालयात घेतली. याचाच फायदा घेत दोन नगरसेवकांनी जिल्हाधिकारी, राज्य शासन व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेऊन शेख यांचे न.प.सदस्यत्व रद्दसाठी याचिका दाखल केली. यामध्ये शेख यांचे सदस्यत्व रद्द झाले. तेव्हापासून शेख यांचे नगरसेवकपद रद्दच आहे. अशातच १६ नोव्हेंबरला पालिकेतील कंत्राट प्रकरणाचा निकाल लागला. या प्रकरणातून इकबाल शेख यांची वर्धा प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यामुळे त्यांना मोठा दिलासा तर मिळालाच शिवाय, त्यांना रद्द झालेले न.प. सदस्यत्व परत मिळविण्याची नामी संधी चालून आली आहे. कंत्राट प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यामुळे न.प. सदस्यत्व परत मिळविण्यासाठी बाजू मजबूत झाली आहे. मात्र यासाठी सर्वोच्च न्यायालयाशिवाय पर्याय नाही. हा न्याय मिळविण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याची माहिती इकबाल शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आठवडी बाजारातील नियमित होणारा बाजार वसुलीचा कंत्राट कंत्राटदार शेख अक्रम शेख गफ्फार यांना वर्धा नगर पालिकेद्वारा देण्यात आला होता. सदर करारापोटी अनामत म्हणून काही रक्कम शेख अक्रम शेख गफ्फार यांना पालिकेत जमा करावयाची होती. त्या रकमेचा धनादेश त्यावेळी नगरसेवक इकबाल शेख यांनी स्वत:च्या बँक खात्यातून दिला. यामुळे त्यांच्यावर दुसऱ्याच्या नावाने स्वत: कंत्राट घेतल्याचा ठपका ठेवत वर्धा पालिकेने त्यांच्याविरुद्ध ५ एप्रिल २०१४ रोजी प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजुच्या युक्तिवाद व साक्षी-पुराव्याअंती इकबाल शेख यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांची या प्रकरणातून निर्दाेष मुक्तता केल्याचा निकाल दिला.(जिल्हा प्रतिनिधी) न.प. सदस्यत्व परत मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणारपालिकेतील कंत्राट प्रकरणातून इकबाल शेख यांची प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यामुळे त्यांना मोठा दिलासा तर मिळालाच शिवाय, त्यांना रद्द झालेले न.प. सदस्यत्व परत मिळविण्याची नामी संधी चालून आली आहे. कंत्राट प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यामुळे ते आता न.प. सदस्यत्व परत मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे संकेत मिळाले आहे. याबाबीला खुद्द इकबाल शेख यांनीही ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला.वर्धा पालिकाही पुन्हा न्यायालयात इकबाल शेख यांनी वर्धा पालिकेची ९ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केली आहे. काही त्रुटी पालिकेच्यावतीने न्यायालयात सादर न केल्यामुळे कंत्राट प्रकरणाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. मात्र पालिका जिल्हा न्यायालयात धाव घेवून निकालाला आव्हान देणार असल्याचे पालिकेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
इकबाल शेख यांच्या बाजूने निकाल, पालिकेला चपराक
By admin | Updated: November 22, 2015 02:14 IST