शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले. भ्रमणध्वनीवरून सूचित केले. दरम्यान, प्रशासक चौधरी आणि ग्रामसेवक चव्हाण यांनी पाहणी करीत ४ इंचाचे प्लास्टिक पाइप टाकून देतो, असे सांगितले.

ठळक मुद्देआलोडीतील चित्र : साटोडा ग्रा.पं. प्रशासनाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायतीअंतर्गत आलोडीतील वॉर्ड क्रमांक सुखकर्तानगर, बुरांडे ले-आउट येथे खुल्या जागेत साचलेल्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. याविषयी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामसेवकाकडून समस्या सोडविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले. भ्रमणध्वनीवरून सूचित केले. दरम्यान, प्रशासक चौधरी आणि ग्रामसेवक चव्हाण यांनी पाहणी करीत ४ इंचाचे प्लास्टिक पाइप टाकून देतो, असे सांगितले. २ एकराच्या खुल्या जागेतील पाणी प्लास्टिक पाइपमधून निघणार नसल्याचे नागरिकांनी प्रशासक आणि ग्रामसेवकाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर नागरिकांनी लोकवर्गणीतून १ फूट डायमीटरचे सिमेंट पाइप आणून दिले. मात्र, ग्रामसेवकाने आडमुठे धोरण अवलंबवित पाइप टाकण्यास टाळाटाळ केली. सिमेट पाइपमधून जात असलेले पाणी पुढे काढण्याकरिता शासकीय जागेतून नाली खोदकामाची मागणी केली. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाची अनास्था कायम आहे. यामुळे ४० ते ५० घरांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाटयावर आला आहे.सुखकर्तानगरात मूलभूत सुविधांचा प्रचंड दुष्काळ आहे. नाल्यांची नियमित स्वच्छता आणि खुल्या जागेतील पाण्याची विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी, नागरिकांच्या घरात पाणी शिरते. मात्र, ग्रामपंचायतीकडून कायम दुर्लक्ष केले जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे यापुढे गृह व इतर कर न भरण्याचा नागरिकांनी पवित्रा घेतला आहे.ग्रामसेवक, प्रशासकाच्या अनागोदी कारभाराची चौकशी करीत साचलेल्या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर सुधा सहारे, मनीषा डाखोरे, विनोद ठिकरे, राजेश गारोडे, गजानन कुंभारे, किशोर चरडे, प्रवीण गंगासागर, रवी कापरे यांच्यासह २६ नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.साटोडयाचे प्रशासक बेपत्तासाटोडा ग्रामपंचायतीची मुदत संपली असून ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र, प्रशासक चौधरी आठ ते दहा दिवसांपासून बेपत्ता असून भ्रमणध्वनीही बंद असल्याने कामाचा खोळंबा झालेला आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRainपाऊस