शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ढेमसावर अज्ञात रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 21:58 IST

यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. तर सध्या सूर्यनारायण आग ओकू पाहत आहे. अशातच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून परिसरातील काही शेतकऱ्यांनी भाजीपाला वर्गीय पिकांचे संगोपन केले आहे.

विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. तर सध्या सूर्यनारायण आग ओकू पाहत आहे. अशातच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून परिसरातील काही शेतकऱ्यांनी भाजीपाला वर्गीय पिकांचे संगोपन केले आहे. परंतु, सध्या ढमस या भाजीपाला वर्गीय पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने सदर पिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.उन्हाळ्याच्या दिवसात चिकणी व परिसरातील काही शेतकरी भाजीपाला वर्गीय पीक घेतात. यात मिरची, पालक, ढमस आदींचा समावेश असतो. शेतकरी भाष्कर काकडे यांनी विविध भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड यंदा केली आहे. यात ढेमस, भेंडी, कार्ली यांचा समावेश असून काही शेत जमिनीवर जनावरांचा चारा म्हणून मकाची लागवड करण्यात आली आहे. शेतातील विहिरीच्या पाणी पातळीत घट झाल्याने त्यांनी २० हजार रुपये खर्च करून विहिरीला गाळमुक्त केले. शिवाय उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून या पिकांचे संगोपन केले. परंतु, मागील पाच ते सहा दिवसांपासून ढेमसाच्या वेलीचे पान करपत आहेत. त्यामुळे उत्पादनातही घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ढेमस या पिकावर आलेला हा रोग कोणता. त्याचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी आता काय करावे, असा प्रश्न सध्या शेतकऱ्याला भेडसावत आहे. हे पीक सध्या फळ धारणावस्थेत असून कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.भावही समाधानकारकफळ धारणावस्थेत असलेल्या ढेमस पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने सध्या ढेमसाच्या वेलीचे पाने अचानक करपत आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. असे असले तरी सध्या बाजारपेठेत ढेमस या भाजीपाला वर्गीय पिकाला समाधानकारक भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगण्यात.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती