शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मुलाखती; २१ जणांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:40 IST

चार विधानसभा मतदार संघापैकीत देवळी आणि आर्वी मतदार संघ वगळता हिंगणघाट आणि वर्धेत भाजपाचेच विद्यमान आमदार आहे. तरिही चारही मतदार संघाकरिता ईच्छूक उमेदवारांच्या आज विश्राम गृहात मुलाखती घेण्यात आल्या. भाजपाचे निरिक्षक तथा ठाणेचे आमदार संजय केळकर यांनी चारही मतदार संघातील २१ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीचे पडघम : नवख्यांच्या गर्दीने वाढली अनेकांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा पक्षानेही मोर्चेबांधणी सुरु केली असून त्याची सुरुवात ईच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीपासून करण्यात आली. गुरुवारी विश्रामगृहात पार पडलेल्या मुलाखतीत चारही विधानसभा मतदार संघातून तब्बल २१ उमेदवारांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. यात नवख्यांनीही हजेरी लावल्याने अनेकांची धडधड वाढली आहे.चार विधानसभा मतदार संघापैकीत देवळी आणि आर्वी मतदार संघ वगळता हिंगणघाट आणि वर्धेत भाजपाचेच विद्यमान आमदार आहे. तरिही चारही मतदार संघाकरिता ईच्छूक उमेदवारांच्या आज विश्राम गृहात मुलाखती घेण्यात आल्या. भाजपाचे निरिक्षक तथा ठाणेचे आमदार संजय केळकर यांनी चारही मतदार संघातील २१ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सुरुवातीला पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. त्यानंतर दुपारी मुलाखतीला सुरुवात झाली.. या मुलाखतीमध्ये हिंगणघाट मतदार संघ वगळता तिन्ही मतदार संघात एकापेक्षा अधिक ईच्छूकांनी उमेदवारी मागितली आहे. विशेषत: ईच्छुकांमध्ये काही सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्यांचा आणि पक्षातीलच पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.वर्धा आणि देवळी मतदारसंघावरच जोरवर्धा मतदार संघात भाजपाचेच विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर असतानाही या मतदार संघातून तब्बल ९ जणांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये डॉ.पंकज भोयर यांच्यासह माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, डॉ. सचिन पावडे, सचिन अग्निहोत्री, सुरेश पट्टेवार, वरुण पांडे, माया उमाटे व राणा रणनवरे यांचा समावेश आहे. तसेच देवळी मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात असल्याने तो बळकावण्याकरिता भाजपाचे कंबर कसली आहे. या मतदार संघातून तब्बल ९ जणांनी उमेदवारी मागितली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. शिरिष गोडे, वैभव काशिकर, मिलिंद भेंडे, अर्चना वानखेडे, जयंत येरावार व संजय गाते, किरण उरकांदे यांचा समावेश आहे.हिंगणघाटमध्ये एक तर आर्वीत चारहिंगणाघाट मतदार संघात भाजपाचेच समीर कुणावार विद्यमान आमदार आहे. या मतदार संघातून त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही उमेदवारी मागितली नाही. तर आर्वी मतदार संघात काँगेसच विद्यमान आमदार असल्याने भाजपाकडून चौघांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये माजी आमदार दादाराव केचे, सुधीर दिवे, डॉ.सचिन पावडे व राहुल ठाकरे यांचा समावेश आहे. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक