लोकमत न्यूज नेटवर्करसुलाबाद : स्थानिक शेतकरी भय्यालाल बमनोटे यांच्या पुढाकाराने येथील बोरीफाटा ते मलकापूर या पादण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची पाहणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कामाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आर्वीचे उपविभागीय महसून अधिकारी शर्मा, तहसीलदार पवार होते.सुमारे ३ किमी लांब व तिस ते चाळीस फुट रुंद असलेल्या या पांदण रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर मशीनच्या इंधनाचा खर्च शेतकरी वर्गणीतून करीत आहेत. परिसरातील ४३ शेतकºयांपैकी २४ शेतकºयांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यांनी लोकवर्गणी करून २० हजार रुपये गोळा केले आहे. तर शेतकरी बमनोटे यांनी ३० हजार दिले. गोळा झालेल्या ५० हजाराच्या रक्कमेतून इंधराचा खर्च केला जात आहे. सदर कामाची पाहणी नुकतीच जिल्हाधिकाºयांनी केली. यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत माहिती जाणून घेतली. या पांदण रस्त्याचा शेतकºयांना लाभ होणार असून शेतोपयोगी साहित्य शेतात नेताना होणारी अडचण दूर होणार आहे.
मलकापूर पांदण रस्त्याची जिल्हाधिकाºयांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:30 IST
स्थानिक शेतकरी भय्यालाल बमनोटे यांच्या पुढाकाराने येथील बोरीफाटा ते मलकापूर या पादण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
मलकापूर पांदण रस्त्याची जिल्हाधिकाºयांकडून पाहणी
ठळक मुद्देशेतकºयांनी सहकार्यातून केला इंधनाचा खर्च