शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडर एजन्सीच्या मनमर्जीला आळा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 21:49 IST

देवळी येथील गॅस सिलिंडर एजन्सीच्या मनमर्जी कारभाराचा तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील पुरवठा विभागाने लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयुवा परिवर्तनची मागणी : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी येथील गॅस सिलिंडर एजन्सीच्या मनमर्जी कारभाराचा तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील पुरवठा विभागाने लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड यांना सादर करण्यात आले आहे.देवळी येथील आर. इंडियन गॅस एजन्सीच्या माध्यमातून नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर वितरीत करण्यात येते. असे असले तरी ऐन सणासुदीच्या व उत्सवाच्या दिवसात आॅन लाईन नोंदणी करूनही वेळीच गॅस सिलिंडर ग्राहकांना दिल्या जात नाही. इतकेच नव्हे तर ग्राहकांकडून अ‍ॅडवान्स बुकिंगच्या नावाखाली पैसे उकळले जात आहे. प्रत्येक ग्राहकाला घरपोच गॅस सिलिंडर देणे क्रमप्राप्त असतानाही अनेक ग्राहकांच्या घरी गॅस सिलिंडर पोहोचविल्या जात नाही. यामुळे तेथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी तात्काळ लक्ष देत योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.जिल्हा पुरवठा अधिकाºयांना निवेदन देताना युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच देवळी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनातून करण्यात आलेल्या मागणीचा विचार वेळीच न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने देण्यात आला आहे.