शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातही सीसीआयच्या कापूस खरेदीची सहकार विभागाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:58 IST

सहकार विभागाकडून सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘आपला कापूस विकला काय, नसेल तर किती कापूस शिल्लक आहे?’ अशी विचारणा सुरू केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा खणखणतोय भ्रमणध्वनीनोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळा सुरू झाला तरी सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या शेतकऱ्यांची कापूस खरेदी संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. अपेक्षित कापसाची खरेदी पूर्ण झाली, तरीही आकडा मात्र फुगलेलाच दिसून येत असल्याने सहकार विभागाकडून आता चौकशीला प्रारंभ झाला आहे. सहकार विभागाकडून सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘आपला कापूस विकला काय, नसेल तर किती कापूस शिल्लक आहे?’ अशी विचारणा सुरू केली आहे.जिल्ह्यामध्ये गतवर्षी २ लाख ३४ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये सरासरी २५ लाख ६७ हजार क्विंटल कापसाचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला होता. लॉकडाऊनपूर्वी सीसीआय, महाकॉट व खासगी व्यापाऱ्यांनी २३ लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण केली. लॉकडाऊनमुळे खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करण्याकरिता नोंदणी करण्यात आले. आठही तालुक्यातील ५० हजार १३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. दरम्यानच्या काळात ३३ खरेदी केंद्रांवरून कापूस खरेदी सुरू केली असून एकूण २९ लाख ५० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तरीही २३ हजार २८२ शेतकऱ्यांकडे २ लाख ५० हजार क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे सांगितले जात असल्याने या नोंदणीतील सत्यता पडताळून पाहण्याकरिता सहकार विभागाने चौकशी आरंभली आहे. या चौकशीच्या पहिल्याच टप्प्यात ८ हजार ७०५ शेतकऱ्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. शेवटपर्यंत जवळपास २० हजार शेतकऱ्यांची नावे बाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. त्यामुळे आता या चौकशीअंती सीसीआय केंद्रही अडचणीत येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील कापसाचे उत्पादन आणि विकलेला कापूस यात तफावत असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून विचारपूस सुरू आहे. पहिल्याच टप्प्यात ८ हजार ७०५ शेतकरी बाद झालेत. हा आकडा आणखी वाढणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी आणि सीसीआय व महाकॉटने खरेदी केलेल्या कापूस उत्पादकांची यादी तपासली जाणार आहे. यात नोंदणी नसलेल्या व्यक्तीचा कापूस खरेदी केल्याचे निदर्शनास आल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.

टॅग्स :cottonकापूस