‘ई सेवा वर्धा डॉट इन’ वर मिळेल कोविड हॉस्पिटलमधील बेडची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 05:00 AM2021-04-13T05:00:00+5:302021-04-13T05:00:14+5:30

 जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्ह्यातील कुठल्या रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर रुग्णखाट उपलब्ध आहे याची माहिती घरबसल्या मिळावी या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्या मदतीने जिल्हाकचेरीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

Information on beds at Kovid Hospital can be found on 'eSewa Wardha.in' | ‘ई सेवा वर्धा डॉट इन’ वर मिळेल कोविड हॉस्पिटलमधील बेडची माहिती

‘ई सेवा वर्धा डॉट इन’ वर मिळेल कोविड हॉस्पिटलमधील बेडची माहिती

Next
ठळक मुद्देजिल्हाकचेरीत नियंत्रण कक्ष स्थापन : जिल्हाधिकाऱ्यांची राहणार करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :  कोविड रुग्णालयातील बेड उपलब्धता स्थितीची माहिती नागरिकांना सहज मिळावी म्हणून वर्धा जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट फोनच्या सहाय्याने ‘ई सेवा वर्धा डॉट इन’ या संकेत स्थळावर जाऊनही नागरिकांना कोविड रुग्णालयातील रिकाम्या रुग्णखाटांची माहिती जाणून घेता येणार आहे.
 जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्ह्यातील कुठल्या रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर रुग्णखाट उपलब्ध आहे याची माहिती घरबसल्या मिळावी या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्या मदतीने जिल्हाकचेरीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षातील ०७१५२-२४३४४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथील कोविड युनिटमध्ये कुठली रुग्णखाट उपलब्ध आहे, याची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविड स्थिती पाहता उभारण्यात आलेल्या या यंत्रणेवर उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार हे लक्ष ठेवणार आहेत. ‘ई सेवा वर्धा डॉट इन’ या संकेत स्थळावर प्रत्येक दोन तासांनी रुग्ण खाटांच्या उपलब्धतेबाबत इत्यंभूत माहिती अपलोड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
 

प्रत्येक दोन तासांनी होणार अपडेशन
 जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात किती रुग्णखाटा उपलब्ध आहेत. तसेच कुठल्या रुग्ण खाटेवर किती रुग्ण आहेत याची माहिती तिन्ही रुग्णालय प्रशासन प्रत्येक दोन तासांनी अपडेट करणार आहेत. या कामात हयगय करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून कठोर कार्यवाही करण्याची भूमिकाही ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड रुग्ण खाटा उपलब्धता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. ०७१५२-२४३४४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यावर नागरिकांना माहिती मिळणार आहे. तसेच ‘ई सेवा वर्धा डॉट इन’ या संकेत स्थळावर रुग्ण खाटा उपलब्धतेची माहिती मिळणार आहे.
- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.

 

Web Title: Information on beds at Kovid Hospital can be found on 'eSewa Wardha.in'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.