शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

डाळी आणि खाद्यतेलाचे भाव वाढल्याने साहजिकच बेसणाचे  व तेलाचे भाव वाढले.  यामुळे आता चकली तीनशे रुपये किलो झाली आहे. मागील वर्षीच्या दीपावलीच्या तुलनेत यंदा दिवाळी फराळाचे भाव २० ते २० रुपयांपर्यंत वधारले आहे. गत काही वर्षांत रेडिमेड फराळ खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. मागणी होत असल्याने आता फराळाची दुकानेही विविध भागात रस्त्याच्या कडेला सजू लागली आहेत. मात्र, महागाईमुळे दुकानांवर फारशी गर्दी नाही.

ठळक मुद्देखाद्यतेल, डाळी महागल्याचा परिणाम ; फराळ विक्रेत्यांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील गाडा रुतला होता.  आता हा रुतलेला गाडा पूर्व पदावर यायला सुरुवात झाली आहे. डाळी, खाद्यतेल व इतर कडधान्य महागल्याने यंदा दिवाळीचा फराळ महागला असल्याचे चित्र असून यावर्षी दिवाळीच्या फराळाला महागाईचा  मोठा तडाखा बसला आहे.डाळी आणि खाद्यतेलाचे भाव वाढल्याने साहजिकच बेसणाचे  व तेलाचे भाव वाढले.  यामुळे आता चकली तीनशे रुपये किलो झाली आहे. मागील वर्षीच्या दीपावलीच्या तुलनेत यंदा दिवाळी फराळाचे भाव २० ते २० रुपयांपर्यंत वधारले आहे. गत काही वर्षांत रेडिमेड फराळ खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. मागणी होत असल्याने आता फराळाची दुकानेही विविध भागात रस्त्याच्या कडेला सजू लागली आहेत. मात्र, महागाईमुळे दुकानांवर फारशी गर्दी नाही.  हवे असणारे फराळ घरीच तयार करण्याकडे अनेकांचा कल दिसून ये त आहे.  त्यामुळे फराळ विक्रेत्यांंनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

उपाहारगृहचालक आता दिवाळीच्या फराळाच्या कामात व्यस्त आर्वीत 95 बचत गट आहे त्यापैकी आधार महिला बचत गट आणि  चार ते पाच महिला बचत गट फराळाचे साहित्य बनवून द्यायचे विक्री करायचे मात्र यावर्षी  कोरोनाच्या प्रभावाने थोडा प्रतिबंध लागला आहे. यंदा फराळाची मागणीमध्ये घट झाल्याचे चित्र असून शंकरपाळे शेव करंजी चकली अनारसे यांच्या मागणीत मात्र वाढ झाली आहे 

दरवर्षी फराळाच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळतात. ऑर्डरनुसार ग्राहकांना आमच्या बचतगटामार्फत फराळ तयार करून दिले जाते. मात्र, यंदा दिवाळी सणावरही कोरोना विषाणू संक्रमणाचे सावट घोंगावत आहे. दिवाळी पाच-सहा दिवसांवर असताना ग्राहकांनी अद्याप फराळाच्या ऑर्डर दिलेल्या नाहीत. ऑर्डर मिळाल्यास फराळ तयार करून देऊ.निर्मला गोडबोले, श्रीकृष्ण महिला बचत गट

तयार बुंदीच्या मागणीमध्ये घट खाद्यतेल आणि डालड्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.  त्यामुळे व्यावसायिकांकडून मोतीचूर लाडू आणि बुंदी तयार करताना भेसळीची शक्यता असल्याने मोतीचूर लाडू आणि बुंदीच्या मागणीत यंदा घट झालेली आहे. शंकरपाळे, शेव, करंजी, अनारसे यांच्या मागणीत मात्र, वाढ झाली आहे.

यंदा दिवाळीच्या पाशवभूमीवर  फराळाचे दर 20 ते 50 रुपयांपर्यंत वाढले आहे. खाण्याचा  तेल आणि डालडा सह   सर्वच धान्यात किराणा सामानात वाढ झाल्याने भाव वधारले आहे.दिवाळी पाच-सहा दिवसांवर आहे. मात्र, फराळ खरेदीकडे अद्याप नागरिकांचा कल दिसून येत नाही. कोरोनामुळे यंदा फराळाला मागणी कमीच राहणार असल्याचे  व्यावसायिक विनोदसिंग राजपूत यांनी सांगितले.

टॅग्स :Diwaliदिवाळी