शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून तरूणांनी साकारला उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:45 IST

शेती व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पादनाचा करण्याच्या दृष्टीकोनातून घोराड येथील तरूणांनी एकत्र येऊन अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून ३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून त्यांनी कृषी व्यवसायातून उन्नतीचा मार्ग शोधला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक : कृषी व्यवसायातून शोधला उन्नतीचा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : शेती व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पादनाचा करण्याच्या दृष्टीकोनातून घोराड येथील तरूणांनी एकत्र येऊन अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून ३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून त्यांनी कृषी व्यवसायातून उन्नतीचा मार्ग शोधला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या उद्योगाला भेट देवून या तरूणांचे कौतुक केले आहे.महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पामार्फत (आत्मा) २६ डिसेंबर २०१६ ला केजाजी अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली. कृषी पदवीका व कृषी डिप्लोमा धारक युवक एकत्रित आले. यामध्ये ३०० शेतकरी सहभागी झाले. त्यांच्या एकजुटीने १० आर. शेती २५ वर्षांच्या लिजवर घेऊन येथे सामूहिक उद्योग उभा करण्यात आला. सामूहिक धान्य साफसफाई, प्रतवारी केंद्र सुरू केले. कमी दरात शेतकºयांना कृषी अवजारे उपलब्ध करून देणे, कृषी केंद्र सुरू करून रासायनिक खत, बियाणे, स्वस्त दरात पुरविणे, अमोनिया अ‍ॅसीड तयार करून शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध करून देणे आदी उपक्रम या कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. शेतकरी ते ग्राहक धान्य विक्री करून अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या युवकांना शेतकºयांची मिळालेली साथ व कंपनीच्या एक वर्षांच्या वाटचालीनंतर आता व्यवसायाच्या माध्यमातून थेट लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून धान्य विक्रीलाही सुरूवात करण्यात येणार आहे. सामूहिक रेशीम उद्योग, शेतमाल उत्पादीत उद्योगाला गुरुवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तहसीलदार महेंद्र सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, तालुका कृषी अधिकारी बाबुराव वाघमारे आदींनी भेट देवून तरूणांच्या या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तरुणांचे कौतुक केले. यावेळी अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विवेक माहुरे, सचिन शैलेश राऊत व संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या उद्योग समुहाच्यावतीने वर्धा रेल्वे स्टेशनवरील मॉलमध्ये व सेवाग्राम येथील डॉक्टर कॉलनी आणि गिताई मंदिर परिसरात आठवडी बाजार लावून थेट शेतकरी ते ग्राहक अशी धान्यविक्री करण्यात येणार आहे. नवीन वर्षांत उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती उद्योग समुहातर्फे देण्यात आली आहे.