शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील आॅनलाईन फसवणुकीचे कनेक्शन दिल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 14:18 IST

सायबर सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आॅनलाईन फसणवुकीच्या गुन्ह्यांचे तार शोधण्यात वर्धा पोलिसांना यश आले असून फसवणुकीच्या तारा थेट दिल्लीत जुळल्या असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देदोघांना अटकमुंबई, पुणे, औरंगाबाद येथील गुन्हेही उघड

रूपेश खैरी ।आॅनलाईन लोकमतवर्धा : सायबर सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आॅनलाईन फसणवुकीच्या गुन्ह्यांचे तार शोधण्यात वर्धा पोलिसांना यश आले असून फसवणुकीच्या तारा थेट दिल्लीत जुळल्या असल्याचे समोर आले आहे.शासन मान्य संकेतस्थळ विकास केंद्र बनावट कॉलसेंटर चालवून सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालणाऱ्या दोघांना दिल्ली येथील तिलक नगर आणि करोल बाग येथून वर्धा पोलिसांनी अटक केली. यातील एकाचे नाव हिमांशु अरोरा व विपुल अरोरा असे असून त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दोघांकडून काम करून घेणारा या सर्व प्रकाराचा मास्टर मार्इंड तुषार अरोरा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटकेत असलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ३० मोबाईल जप्त केले आहे. यात मोबाईलवरून केलेल्या कॉल्सची माहिती घेतला असता या दोघांनी राज्यातीलच नाही तर अख्या देशातील नागरिकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.वर्धेत घडलेल्या १ लाख ६० हजार रुपयांच्या गुन्ह्याचा तपास करताना हा प्रकार उघड झाला आहे. या तपासाची लिंक शोधत वर्धा पोलिसांनी दिल्ली गाठली असता एका मोबाईलच्या दुकानातून सिम खरेदीच्या प्रकारातून हा गुन्हा उघड झाल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.चार महानगरातील गुन्हेच्दिल्ली येथून अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून एकूण ३ लाख ६७ हजार रुपयांचे गुन्हे उघड झाले आहे. यात औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे तसेच वर्धा व मध्यप्रदेशातील इंदोर येथील गुन्ह्याचा समावेश आहे.अनेकांनी तक्रारीच केल्या नाहीच्पोलिसांनी जप्त केलेल्या ३० मोबाईलची तपासणी केली असता तेथून देशभर फोन केल्याचे समोर आले आहे. फोन केलेल्या प्रत्येकालाच या फ्रॉड कॉल सेंटरवरून गंडा बसल्याचे समोर आले आहे. यापैकी अनेकांनी तक्रारीच केल्या नसल्याचे यात समोर आले आहे. यामुळे या तिघांकडून नेमका किती जणांना गंडा बसला हे सांगणे कठीण असल्याचे समोर येत आहे. यात आणखी किती गुन्हे समोर येतात याकडे पोलिसांचे लक्ष आहे.रोज १५०० जणांना कॉलच्या आॅनलाईन चोरट्यांकडून रोज सुमारे १ हजार ५०० जणांना कॉल करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. येथे सापडलेल्या ३० सिमकार्ड पैकी एका कार्डावरून दिवसाला ५० फोन जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा