वर्धा : स्वतंत्र समता शिक्षक संघाची बैठक चैतन्य कॉलनी सावंगी (मेघे) येथे सरचिटणीस गौतम पाटील यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुनील तेलतुंबडे तर मार्गदर्शक म्हणून दिलीप वावरे, धमेंद्र अंबादे, सुरेखा ढाले व सुरेश सांगोले उपस्थित होते. बैठकीत संघटनेचे कार्य व विस्तार याविषयी माहिती देण्यात आली. यापुढे संघटनेचे नाव ‘स्वातंत्र समता शिक्षक संघ’ असे राहील हे जाहीर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व संघटनेचे योगदान, १४ एप्रिल पूर्वी वेतन न झाल्यास संघटनेची भूमिका, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची शासनाची भूमिका, डीसीपीएस कपात बंद करणे व जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांच्या समस्या व त्यावरील मार्ग, मोक्याच्या जागी मागासवर्गीयांना हेतुपुरस्पर डावलणे, बिन्दुनामावलीतील घोळ, जि. प. बॅँक निवडणूक व पूर्वतयारी, शिक्षक समायोजन व पदोन्नती इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक गौतम पाटील यांनी केले आभार दीपक नगराळे यांनी मानले. जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे निवडक सदस्य बैठकीला उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रकाश पखारे, दिलीप कांबळे, महेंद्र आडे, विलास आटे, किशोर वानखेडे, दीपचंद भगत, सचिन शंभरकर, विक्रम तामगाडगे यांनी केले.(शहर प्रतिनिधी)
स्वतंत्र समता शिक्षक संघाची बैठक
By admin | Updated: April 16, 2016 01:38 IST