शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:28 IST

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली. मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.

ठळक मुद्देधोत्रा व तळेगाव (टा.) येथे वीज पडून सहा गुरे दगावली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली. मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सुमारे १५ ते २० मिनीट चाललेल्या या पावसामुळे शेतकरी व सामान्यांचे मात्र मोठे नुकसान झाले. धोत्रा व तळेगाव (टा.) येथे वीज पडून सहा जनावरे दगावली. यात शेतकºयांचे २ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.दिवसभर उन्हाचा तडाखा असताना सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची दाटी झाली. विद्युल्लतेचा कडकडाट आणि वादळी वाºयासह पावसाचे आगमन झाले. सायंकाळी वादळी वाºयासह आलेल्या या पावसाने मोठे नुकसान केले. शिवाजी चौक परिसरातील एक दुकान वादळी वारा व पावसामुळे कोसळले. यात दुकान मालकाचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय शिवाजी चौक ते आर्वी नाका मार्गावर दोन झाडे कोसळली. यात संबंधितांचे नुकसान झाले. आर्वी नाका परिसरातही अजस्त्र वृक्ष कारवर उन्मळून पडले. यात संबंधित कार धारकाचे नुकसान झाले. शहरात वादळी वाºयामुळे अनेक फलक उडालेत, अनेकांच्या दुकानांतील साहित्य अन्यत्र उडून गेले. अचानक आलेला हा पाच ते दहा मिनीटांचा पाऊस मोठे नुकसान करून गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सेवाग्राम मार्गावरील अनेक झाडांच्या फांद्याही तुटल्याने नागरिकांचे नुकसान झाले.यातच एकुर्ली येथील मारोती बारकू गिरडकर यांच्या धोत्रा (कासार) शिवारातील शेतात वीज कोसळली. यात शेतात बांधून असलेले दोन बैल, दोन गायी व एक वासरू ठार झाले. यात त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने शेतकरी मारोती व त्यांचा मुलगा थोडक्यात बचावले असले तरी विजेची आस लागल्याने शेतकºयाचा पाय भाजला गेला. याच सुमारास वर्धा तालुक्यातीलच तळेगाव (टा.) येथे विठ्ठल मारोतराव तपासे यांच्या शेतातही वीज कोसळली. यात शेतात असलेला एक बैल ठार झाला. यामुळे शेतकरी तपासे यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात अन्यत्र ाीज पडल्याच्या घटनांची नोंद नाही. नारायणपूर शिवारात वादळी वारा व पावसामुळे रस्त्यालगतची मोठी झाडे उन्मळून पडली. शिवाय जिल्ह्यात देवळी, वर्धा, सेलू, समुद्रपूर व हिंगणघात तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. इंझाळा, नाचणगाव शिवारात जोरदार पाऊस झाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील टीनाही उडून गेल्याचे वृत्त आहे.विद्युत पुरवठा खंडितवादळी वाºयासह जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वर्धा शहरात तब्बल एक ते दीड तास विद्युत पुरवठा खंडित होता. शिवाय वडनेर, नारायणपूर, इंझाळा यासह अनेक ठिकाणी पावसाचे आगमन होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. पाऊस थांबल्यानंतर वर्धा शहरासह काही ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला तर ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले नाही. 

टॅग्स :Rainपाऊस