शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
4
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
5
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
6
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
7
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
8
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
9
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
10
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
11
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
12
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
13
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
14
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
15
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
16
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
17
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
18
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
19
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर

वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब

By admin | Updated: April 17, 2016 01:59 IST

वाढते प्रदूषण सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे प्रत्येकानेच नो व्हेईकल डे या उपक्रमात सहभाग घेऊन वाढत्या प्रदूषणाबाबत लोकांना अवगत केले पाहिजे.

रामदास तडस : ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमातून जनजागृतीदेवळी : वाढते प्रदूषण सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे प्रत्येकानेच नो व्हेईकल डे या उपक्रमात सहभाग घेऊन वाढत्या प्रदूषणाबाबत लोकांना अवगत केले पाहिजे. तसेच स्वच्छता अभियानात योगदान देवून सुंदर व स्वच्छ शहरासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. शनिवारी ‘नो व्हेईकल डे’ निमित्त स्थानिक न. प. प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे प्रबोधन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून खा. तडस बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून न. प. शिक्षण सभापती बंडू जोशी, बांधकाम सभापती दिलीप कारोटकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर, डॉ. श्रावण साखरकर, महालक्ष्मी टीएमटी प्रा.लि.चे प्रकाश दुधकोहळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी खा. तडस यांच्या उपस्थितीत शहरातून सायकल सायकल रॅली काढण्यात आली. याप्रंसगी प्रदूषणमुक्त समाज व्यवस्थेसाठी नारे देण्यात आले. बहुतेक आजाराचे संक्रमण हातामुळे होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले हात स्वच्छ ठेवले पाहिजे. शारीरिक श्रम कमी करीत दिवसेंदिवस मोटारगाड्यांकडे लोकांचा कल वाढत आहे, असे विचार डॉ. कोल्हटकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सभापती जोशी व पोलीस निरीक्षक मदने यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक हरिदास ढोक यांनी केले. संचालन प्रा. पंकज चोरे तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका चंदा वरकड यांनी मानले.यावेळी प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता भगत, शिक्षक सुदर्शन चलाख, फरहतखान तबस्सुम, मोहम्मद अब्रार, प्रा. नितीन आचार्य, प्रा. शिवप्रसाद बागडे, शरद आदमने, अनूप कपूर, प्रवीण फटींग, सागर वानखेडे, गणेश शेंडे, अमर मुरार, निलेश डंभारे, सुजित झांबरे, अक्षय हिंगे, अविनाश फुलमाळी, सुदर्शन शंभरकर, अमन बटन, पवन आटे, देविदास कडूकर, गणेश कन्नाके, मंगेश साटोणे, चरण बोंडेकर, शिवा गोडबोले, सोहेल शेख, सुरेंद्र राठोड, गौरव सुरकार, करण तांबोडकर, दीक्षा चिचघाटे, आकांक्षा बेंदले, सीभरण वावरे, दीपक गोडबोले, क्षीतीज गोडबोले, समीर साहू, सौरभ लाडेकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)